कोपरखैरणे येथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारी विद्युत पुरवठ्याची डीपी हटवण्याची नागरिकांची मागणी!

नवी मुंबई : कोपरखैरणे विभागातील सेक्टर २ येथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांनी नागरिकांना विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून लावलेली विद्युत वाहिनीची डीपी नागरिकांचा जीव घेणारी ठरणारी आहे या विद्युत वाहिनीच्या डीपीला त्वरित हटवून इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावी अशी मागणी कोपरखैरणे येथील हनुमान अपार्टमेंट ओनर्स असोशियन यांच्यामार्फत केली जात आहे याबाबत या  असोशनाच्या कमिटीने विद्युत विभागांच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलेले आहे. या मागणीचा पाठपुरावा पुरावा करून देखील विद्युत विभागाच्या वतीने आतापर्यंत कोणतीच कारवाई न केल्याने येथील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे सेक्टर नंबर दोन ऑफिस नंबर ७३६व  ७३७ कोपरखैरणे भारत मटन शॉप या शॉप समोरील विद्युत डीपी ही रोडच्या बाजूला आहे तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची रहदारी असल्याकारणाने या डीपीच्या परिसरात नागरिक येत जात आहेत पावसाच्या काळात एखाद्या वेळी विद्युत पुरवठा सुरू असताना अचानकपणे शॉर्टसर्किट झाल्यास नागरिकांना प्राण गमावा लागेल अशी भीती हनुमान असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हि डी पी त्वरित हटवून विद्युत विभागाने नागरिकांचा प्राण वाचवावा अशी याचना येथील नागरिक करत आहे.

सदर विद्युत डीपी ला त्या ठिकाणाहून हटवण्यासाठी कोणत्यातरी व्यक्तीचा विरोध आहे मात्र एखाद्या व्यक्तीच्या व्यावसायिक हितासाठी भल्यासाठी किंवा त्याच्या उद्योगधंद्यासाठी त्यांनी सदर डीपी काढण्यास विरोध केल्यास त्या व्यक्तीचे कोणत्याच प्रकारचे कोपरखैरणे विद्युत प्रशासनाने न ऐकता नागरिकांचा जीव धोक्यात जाऊ नये यासाठी दक्षता घेतली पाहिजे असे आमचे मत आहे.

हनुमान अपरमेंट ओनर्स   असोसिएशन

    पदाधिकारी

संबंधित पोस्ट