जनकल्याण सामाजिक संस्था च्या वतीने जागतिक महिला दिन महिलांना साडी वाटप करून साजरा

नवी मुंबई : जनकल्याण सामाजिक संस्था आणि प्रबुद्ध दिव्यांग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई येथील गुरव हॉल वाशी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. 

संस्थेच्या वतीने सगळ्यांचे स्वागत करण्यात आले. स्त्रियांनी गाणी बोलून कार्यक्रमाला एक आगळी शोभा आणली. संस्थेचे अध्यक्ष राजेश जैस्वार यांनाही गाण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी महिलांच्या कर्तुत्वाला गाण्याद्वारे सलाम केला. प्राध्यापक सुरत्न आराख यांनी अध्यक्षांच्या दातृत्वाला त्वरित गाणे रचून दाद दिली. त्यानंतर महिलांना साड्या आणि मुलांना मिठाई वाटून आनंद निर्माण केला गेला. दिव्यांग स्त्री-पुरुषांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रबुद्ध दिव्यांग फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा गजभिये यांनी सर्वांचे आभार मानले.अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला.

संबंधित पोस्ट