रबाले एमआयडीसी पोलीस हद्दीमधल्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले !

२६ पोलीस अधिकारी १७९ अंमलदार यांच्या १३ तुकडी मध्ये विभागणी करून रबाले पोलीस ठाण्याकडून कोम्बिन ऑपरेशन !

नवी मुंबई : रबाले एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दी मध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे परिमंडळ एक यांच्या नेतृत्वाखाली रबाले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये  कोंम्बिगऑपरेशन करण्यात आले. यात संशयित गुन्हेगार व जामिनावर सुटका होऊन अथवा फरार असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी कोपरखैरणे पोलीसांनी कंबर कसली असून यातून रबाले एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हेगारीला आळा बसणार असून गुन्हेगारी क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

रबाले एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरात वाढत्याअंमली पदार्थ उच्चाटनासाठ कोंबिंग ऑपरेशन करून हिस्ट्रीशीटर गुंड रेकॉर्डवरील असलेले आरोपी पाहिजे असलेले आरोपी संशयित इसम इत्यादी आरोपींची कसून तपासणी करून प्रतिबंधक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आदेशित केले होते त्यानुसार परिमंडळ एक पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस बळाची मागणी करून २६ पोलीस अधिकारी १७९ अंमलदार यांच्या विविध प्रकारच्या १३ तुकड्या बनवून ४ ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते व नऊ पथक वेगवेगळ्या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन साठी तैनात करण्यात आले होते कोंबिंग ऑपरेशनचा दरम्यान भीम नगर झोपडपट्टीतील गार्डन जवळ संशयित नायजेरियन नाव पिटा किसीडी वय वर्ष (३२) राहणार तळोजा नवी मुंबई मूळ पत्ता लेगस नायजेरिया या इसमांकडून ५५ कि. ग्राम वजनाची मेथडॉन पांढऱ्या रंगाची पावडरचा मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदण्यात आला आहे व पुढील तपास सुरू असून या आरोपीच्या मुस्क्या आवळण्यात रबाळे पोलिसांना यश प्राप्त झाले आहे

(२) आरोपी दीपक बाबर पवार यांच्याकडून ४ किलो ८६७ ग्राम वजनाचा गांजा विक्री करिता बाळगून असल्याने त्याच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे (३) करण राजा चोटले या आरोपीकडे १५ इंच लांबीच्या धारदार सुरा पोलिसांनी हस्तगत केला आहे (४) आरोपी गोपाळ प्रसाद दिना नाथ तत्वा हा साईनगर भागात फिरत असल्याने त्याच्या ताब्यातला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी सचिन गणपत बरफ हा तडीपार आरोपी असून तो संभाजीनगर भागात मिळून आल्याने त्याच्याविरोधात मुंबई पोलीस ऍक्ट १९५१ कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कोंबिंग ऑपरेशन मध्ये शरीराविरुद्ध व माला विरुद्ध २० आरोपी चेक करण्यात आले ते मिळून आल्याकारणाने कोफ्ता अंतर्गत ८३ कारवाई करण्यात आले आहेत मुंबई पोलीस कायदा ३३ डब्ल्यू अंतर्गत १५ कारवाई करण्यात आले आहेत एमव्ही कायदा १०२ प्रमाणे ०९ कारवाई करण्यात आले आहेत भादवि कलम २८३/२८५ प्रमाणे एकूण ०४ कारवाई करण्यात आले आहेत एन बी डब्ल्यू वॉरंट अंतर्गत ०५ कारवाई करण्यात आले आहेत बी डब्ल्यू वॉरंट अंतर्गत ०६ कारवाई करण्यात आले आहेत हो ५० समन्स बजावणी करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रोव्हीबीशन कायद्यानुसार ०२ इसमावर कारवाई करण्यात आली आहे जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये ०१ कारवाई करण्यात आली एनडीपीएस consumption ०५ कारवाई करण्यात आली 

दरम्यान रबाले एमआयडीसी पोलीस स्टेशन एकूण ४ ठिकाणी नाके बंदी लावण्यात आली होती२९ एमव्ही कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे पाहिजे असलेले आरोपी चेक केले असता दोन आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे

याबाबत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक वाशी नवी मुंबई पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश गावडे, यांच्या मार्गदर्शनाखाली रबाले एमआयडीसी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस संजय पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कंभार, प्रबोधन येजरे, प्रियंका खरटमल, पोलीस उपनिरीक्षक दीपक शेळके, राहुल गरड, लाला लोणकर, माधुरी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संदेश तांवे

नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत इतर अधिकारी व अंमलदार व एमआयडीसी रबाले पोलीस ठाणे येथील पोलीस कर्मचारी वर्ग दिनांक ०७/०३/२०२४ रात्री दहा ते दिनांक ०८/३/२०२४ पहाटेच्या ३ पर्यंत  ही मोहीम राबविण्यात आली

संबंधित पोस्ट