रबाळे सायबर क्राईम पोलिसांनी केली यशस्वी कामगिरी !ऑनलाईन लबाडांकडून १२ लाख रक्कम गोठविण्यात यश!
दुसऱ्या घटनेत ४ लाख ५ हजार ५११ रुपयाची रक्कम तक्रारदाराला केली परत!
नवी मुंबई :रबाळे परिसरात अमित शंभरकर या तक्रारदाराची ऑनलाइन टेलिग्राम टास्क फ्रॉड द्वारे फसवणूक झाल्याची तक्रार त्याने सायबर पोर्टलवर दाखल केली होती या तक्रारीची गंभीर दखल घेत रबाले सायबर क्राईम पोलिसांनी संबंधित बँकांशी त्वरित संपर्क करून फसवणूक झालेली रक्कम बँकांकडून थांबविण्यास यश प्राप्त केले आहे सदरची रक्कम तक्रारदार अमित शंभरकर यांना न्यायालयाकडून परत करण्याची तजवीज ठेवली असून पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये समाधान व्यक्त होत आहे
तर दुसऱ्या घटनेत ऐरोली विभागात राहणाऱ्या देशपांडे नावाच्या तक्रारदाराला टास्क फ्रॉड च्या माध्यमातून त्याची ऑनलाइन फसवणूक केली होती त्या फसवणूक द्वारे त्याचे ४ लाख ५ हजार ५११ इतक्या रक्कमची फसवणूक झाली होती त्याने याबाबत सायबर पोर्टलवर तक्रार दाखल केली होती.
तक्रारदार देशपांडे याबाबत राबळे पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्याच्याबरोबर झालेला ऑनलाईन टास्क फ्रॉडची माहिती राबाले सायबर क्राईम ला रीतसर दिली रबाळे सायबर क्राईम पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून तक्रारदार देशपांडे यांची फसवणुकी दरम्यान झालेली ४ लाख ५ हजार ५११ इतकी रक्कम सुरक्षित रित्या मिळून देण्यात रबाळे सायबर क्राईम पोलिसांना कारवाई करत आहे.
दरम्यान. या दोन्ही घटनेमध्ये तक्रार अमित शंभरकर व देशपांडे यांनी रक्कम कर्ज काढून दिली असल्याकारणाने ते व्यथित होते मात्र सायबर क्राईम पथक अधिकारी व अंमलदार यांनी आदेशित केल्याने अर्जदार यांचे विविध बँक खात्यात गेलेली रक्कम गोठविण्यासाठी बँकांना तात्काळ ई-मेल केल्याने सदरची रक्कम गोठविण्यात आली आहे दुसऱ्या घटनेतील म्हणजे देशपांडे यांची ४ लाख ५ हजार पाचशे अकरा ही रक्कम तक्रारदार देशपांडे यांना देण्यात सायबर पोलिसांना यश प्राप्त झाले आहे
तर अमित शंभरकर यांची फसवणूक झालेली १२ लाख ही रक्कम न्यायालयामार्फत देण्याची कारवाई करीत आहे याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोपाळ ,पी सी श्री दुबे व रबाले पोलिसांचे नागरिकाकडून कौतुक करीत आहे. रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री धुमाळ यांनी नागरिकांना सायबर क्राईम संबंधात जागरूकता बाळगण्याचे आव्हान केले . पुढील कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोपाल करत आहेत.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम