रबाले पोलीस ठाणे चे सायबर क्राइम पथकाने ऑनलाईन फसवणुक करणाऱ्या आरोपींना हरियाणा व भोपाळ मध्ये कारवाई करून केले जेरबंद !
नवी मुंबई : सायबर क्राईम च्या घटना दिवसान दिवस वाढत असून या घटनेला आळा घालण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी पुढाकार घेतला आहे रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठपोलीस निरिक्षक श्री संजीव धुमाळ याचे मा्गदर्शन खाली सायबर क्राईम पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोपाळ पथकाने सायबर क्राईम च्या घटनेतील आरोपींना हरियाणा व भोपाळ या परराज्यातील शहरात जाऊन आरोपील जेरबंद करण्यात यश प्राप्त केले आहे.
आरोपी मनोज ओम प्रकाश कुमार वय वर्ष (३३) या आरोपींस ताब्यात घेऊन हरियाणा मां.न्यायालयाने जी एम एफ सी गुरुग्राम येथील न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे या आरोपीकडून २ सिम कार्ड व १ मोबाईल रबाले सायबर क्राइम पथकाने हस्तगत केला आहे
आरोपी (2) इर्शाद अखिल अली खान या आरोपीचा गुडगाव हरियाणा शहरामध्ये 3) एस. जैन यांचा भोपाळ मध्ये शोध घेऊन त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली आहे
आरोपींच्या खात्यातील ६ लाख पेक्षा अधिक रक्कम गोठवली!
याबाबत गुन्ह्याची हकीकत अशी की फिर्यादी यांचे अँड्रॉइड मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने मेसेज व लिंक पाठवून तसेच मोबाईल कॉल करून आयसीआयसीआय बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादीला क्रेडिट कार्ड रिवार्ड पॉईंट मिळाले आहे असे भासवून फिर्यादी कडून क्रेडिट कार्ड ची माहिती घेतली फिर्यादीचा मोबाईल हॅक करून फिर्यादीचे आयसीआयसी क्रेडिट कार्ड खातेतून रक्कम रु.१लाख८९ हजार २१८.५९/- ची आर्थिक फसवणूक केली होती याबाबतची फिर्याद रबाले पोलीस ठाण्यात दाखल झाली होती या फिर्यादीची गंभीर दखल मां. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजीव धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली रबाळे सायबर क्राईम पथकाचे राम गोपाल व त्यांच्या पथकाने आरोपींना दिल्ली व हरियाणा येथून अटक केली असून या आरोपींच्या मुस्क्या आवळण्यात यश प्राप्त केले आहे
दरम्यान : आरोपी यांनी फसवणूक करून घेतलेली रक्कम विविध बँकांच्या बैंक खात्यांवर वर्ग झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती रबाले पोलीस यांनी दिली आहे. तसेच तपासादरम्यान पोलीसांकडून आत्तापर्यत ६ लाख पेक्षा अधिकची रक्कम गोठविण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रबाळे सायबर तपास पथकाने कसून शोध घेऊन आरोपीताचा तांत्रिक तपासा दरम्यान आरोपींना जेरबंद केले आहे रबाळे सायबर तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोपाळ पोलीस कर्मचारीपो.शी. ३५७७/प्रवीण भोपीं ३ पो.शी. ३८९७/ अभिजीत राळे यांनी अथक परिश्रम घेऊन ही यशस्वी कारवाई केली आहे
याबाबतचा पुढील अधिक तपास सायबर क्राईम रबाले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोपाल हे करत आहेत
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी जनतेला ऑनलाईन व्यवहार बाबत सतर्क राहण्याच्या सल्ला दिला आहे.तसेच फसव्या जाहिराती तसेच सायबर फ्रौड होणार नाही यासाठी जागरूक राहावे. अमिष्याला बळी पडू नये. असे आवाहन केले आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम