पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची कोपरखैरणे पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट !
नवी मुंबई : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश निळकंठ देशमुख यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कोपरखैरणे पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करत त्यांनी घेतलेल्या धडाडीच्या कारवाईमुळे कोपरखैरणे व परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून कोपरखैरणे विभागातील कोंबिंग ऑपरेशन दरम्यान एक गुन्हेगाराचा पाठलाग करून त्याच्या ताब्यातून धारदार कोयता जप्त करता वेळी झालेल्या झटापटीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटलांना दुखापत झाली होती या स्वरूपाची बातमी दैनिक आदर्श महाराष्ट्र या वर्तमानपत्राने व इतर वर्तमानपत्रा मध्ये प्रकाशित झाली होती प्रसार माध्यमाच्या वृत्ताची दखल घेऊन पनवेल महानगर-पालिकेचे कर्तव्यनिष्ठ महानगर-पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्याला अचानक भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली
दरम्यान: औदुंबर पाटील यांनी कोपरखैरणे पोलीस स्टेशन चा चार्ज हाती घेतल्यापासून त्यांनी गुन्हेगारांना व अंमली पदार्थ तस्करांचा शोध घेऊन त्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनाचे नाव जनमानसात उंचावले असल्याची भावना पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी व्यक्त करून
वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील व पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुहास चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहकार्यांना देखील पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम