उत्तर प्रदेशातून नवी मुंबई सायबर पोलिसांनी आरोपीच्या मुस्क्या आवळल्या!
३९ लाख ३५ हजार ५२१ रक्कम गोठविण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश !
नवी मुंबई : फेसबुकच्या माध्यमातून मैत्रीचे नाते जोडून फसवणूक करणाऱ्या लबाडांना नवी मुंबई सायबर पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी उत्तर प्रदेशातील लखनऊ या भागातून कसून तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश प्राप्त केले आहे.
आरोपी फेसबुक द्वारे संपर्कात येऊन फॉरेक्स ट्रेडिंग व क्रिप्टो ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत असत या गुंतवणुकीच्या माध्यमातून जास्त नफा मिळून दिला जाईल असे अमिष आरोपी दाखवत असत याबाबत सायबर पोलीस ठाणे नवी मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल झाली असता सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम व त्यांच्या पथकाने योग्य दिशेने तपास करत वापरलेली बँक खाती तसेच मोबाईल क्रमांक यांचे तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपींचा राहण्याचा ठिकाण सायबर पोलिसांना प्राप्त झाला त्यानुसार सायबर पोलिसांनी पथक निर्माण करून उत्तर प्रदेशातून आरोपी मोहिनीश देवेंद्र राजपाल वय वर्ष (३६) धंदा लॉज चालक राहणार लखनऊ राज्य उत्तर प्रदेश या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपी तक्रारदार यांना वेगवेगळ्या बँक खात्याची माहिती पाठवून त्याद्वारे ऑनलाइन पद्धतीने पैसा भरना करायला सांगायचा तक्रारदार यांची एकूण ६० लाख २३ हजार १४६ इतकी रक्कम फसवणूक केली होती. त्यापैकी ३९ लाख ३५ हजार ५२१ इतकी रक्कम बँकांना पत्र व्यवहार करून नवी मुंबई सायबर पोलीस पथकाने गोठवली आहे.
आरोपी मोहिनीश देवेंद्र राजपाल यांनी आपण आपल्या साथीदारांना सोबत घेऊन ही फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. दुसरा आरोपी अंशुमन अरमान सिंह वय वर्ष (२३( धंदा) बेकरी चालक राहणार लखनऊ राज्य उत्तर प्रदेश याला अटक करण्यात सायबर पोलिसांना यश प्राप्त झाले आहे
दरम्यान आरोपींनी महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील विविध राज्यातील असे एकूण ११५ सायबर गुन्ह्यामध्ये तपासा दरम्यान सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे हे आरोपी विविध बँकेमध्ये करंट अकाउंट उघडून मोबदल्यात बँक खात्यावर झालेल्या ट्रांजेक्शनच्या टक्केवारी प्रमाणे कमिशन देण्याचे अमिष दाखवत होते प्राप्त केलेल्या बँक खाते त्यांचे धनबाद झारखंड येथील अन्यसाथीदार यांना जाऊन देत होते सदर बँक खात्याचा उपयोग सायबर फ्रॉड करण्यास वापरत असल्याचा तपासात निष्पन्न झाले आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्त नवी मुंबई मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त नवी मुंबई संजय येनपुरे, सह पोलीस आयुक्त नवी मुंबई दीपक साकोरे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे अमित काळे, पोलीस उपायुक्त धनाजी क्षीरसागर, सहाय्यक पोलीस आयुक्त आ.गु.शा /यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर, पोलीस शिपाई निरांज दाभाडे, पोलीस शिपाई भाऊसाहेब फंटागरे,व मुंबई पोलीस शिपाई पूनम गडगे, या पथकाने उघडकीस आणला असून पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन करत आहेत.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम