कोपरखैरण्या मधल्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले !

३० पोलीस अधिकारी २०० अंमलदार यांच्या १४;तुकडी मध्ये विभागणी करून कोपरखैरणे पोलीस ठाण्याकडून कोम्बिन ऑपरेशन !

नवी मुंबई - कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या हद्दी मध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे परिमंडळ एक यांच्या नेतृत्वाखाली कोपरखैरणे बोनकोडे परिसरात  कोंम्बिग ऑपरेशन करण्यात आले. यात संशयित गुन्हेगार व जामिनावर सुटका होऊन अथवा फरार असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी कोपरखैरणे पोलीसांनी कंबर कसली असून यातून कोपरखैरणे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हेगारीला आळा बसणार असून गुन्हेगारी क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

कोपरखैरणे परिसरात वाढत्याअंमली पदार्थ उच्चाटनासाठ कोंबिंग ऑपरेशन करून हिस्ट्रीशीटर गुंड रेकॉर्डवरील असलेले आरोपी पाहिजे असलेले आरोपी संशयित इसम इत्यादी आरोपींची कसून तपासणी करून प्रतिबंधक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आदेशित केले होते त्यानुसार परिमंडळ एक पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस बळाची मागणी करून ३० पोलीस अधिकारी २०० अंमलदार यांच्या विरुद्ध प्रकारच्या १४ तुकड्या बनवून नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार काही  आरोपींना यांच्या राहत्या घरात जाऊन  कसून चौकशी करण्यात आली त्यात काही आरोपी जामीनावर सुटलेले आहेत किंवा कसे याची कसून तपासणी करण्यात येत आहे व काही नागरिक बंगाल देशी आहेत किंवा कसे याबाबत देखील चौकशी करण्यात येत आहे काही संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे

या कोंबिंग ऑपरेशन मध्ये १७ घरफोड्या मधील आरोपी सलीम इमाम उद्दीन खान वय वर्ष (२८) राहणार कुलसून बिल्डिंग खैरणे गाव नवी मुंबई याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे 

शरीराविरुद्धच्या दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी रिजवान साधी कुरेशी वय वर्ष (३२) राणा क्लासिक पॅराडाईस खैरणे गाव याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे बांगलादेशी महिला पॉपी इमररुल मुल्लावय वर्ष (२०) राहणार कुलसुम अपारमेंट खैरणेगाव व तिच्या सोबत असलेल्या तिचा धीर लाहू मुन्ना याने पोलीस पथकाला पाहून धूम ठोकले असून या महिलेकडे पोलिसांनी विचारणा केली असता तिला तिच्या गावचे नाव व ठिकाण न सांगता आल्याकारणाने सदरची महिला ही बंगाल देशाची असल्याचा पोलिसांचा कायस कायम आहे त्यानुसार पोलिसांनी तिचे पती अलीम मुवा याचा मोबाईल प्राप्त केला असता तो थोड्यावेळाने येतो असे सांगून त्यांनी मोबाईल स्विच ऑफ केला आहे या महिलेची देखील पोलीस कसून चौकशी करतात सदर महिलेचा नागरिकत्वाबाबत तपास करून

योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलिसांनी  सांगितले कोपरखैरणे येथील खुनासारख्या  गंभीर गुन्ह्यातील अटक आरोपी अजू जॉन फ्रान्सिस वय वर्ष (२७) राणा सिद्धिविनायक बिल्डिंग सेक्टर १२ बोनकोडोगाव हा आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो जामिनावर सुटल्याचे सांगितले सदर वेळी त्याच्याकडे जामिनाचे आदेशाच्या प्रतीची मागणी केली असता त्याने कोणतेही कागदपत्र सादर केले नाहीत व विचारलेल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिले नाहीत आरोपीचे जामीन याबाबत न्यायालय व जेल प्रशासन यांच्याकडील अभिलेख तपासून योग्य कारवाई करण्याची तजवीज कायम ठेवली आहे जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी सहील रफिक अन्सारी राहणार मरीआई चौक घनसोली गाव नवी मुंबई याला देखील ताब्यात घेतली असून त्याच्याकडून ४ मोबाईल ताब्यात घेतले आहेत .

कॉमिंग ऑपरेशन२३:३० दरम्यान  कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील हे आपल्या गाडीतून पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाले असता सेक्टर ५ येथील पारसिक कोपरखैरणे बँकेच्या  समोर एक बाईकस्वार त्याच्या अंगावर कोयता लपवीत संशयित्या जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या लक्षात आले त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलीस पोलीस हवालदार क्रमांक ३८७ संजय जाधव व पोलीस शिपाई क्रमांक १२१४५ यांनी  योग्य तो बाळाचा वापर करून कोयता ताब्यात घेतला या झटापटीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना दुखापत झाली असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता मात्र गुन्ह्यातील माहिती व आरोपीचे वर्णन करून गुन्हे प्रकटीकरण पथकाने कसून शोध घेत गुप्त बातमीदारा मार्फत आरोपी नितीन संपत खरात वय वर्ष (२४) अविनाश बेटा बिल्डिंग कोपरखैरणे शिवसेना शाखेत जवळ याला गजाआड केले आहे  याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण करत आहेत. 

दरम्यान: सदर कोंबिंग ऑपरेशन मध्ये  २७ समन्स दोन बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली तसेच तीन नॉनेबेल वॉरंटी मधील इसमांचा शोध घेतला असता त्यातील दोघेजण सध्या जेलमध्ये सजा भोगात असून एक आरोपी कर्नाटक राज्यात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे याबाबत न्यायलात पूर्तता अहवाल पाठविण्याची तजवीज ठेवली आहे.

याबाबत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक वाशी नवी मुंबई पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश गावडे, यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक दाभोळकर पोलीस उपनिरीक्षक असुरे पोलीस उपनिरीक्षक दळवी पोलीस उपनिरीक्षक वने पोलीस उपनिरीक्षक वरुडे पोलीस उपनिरीक्षक कन्हेवाड पोलीस उपनिरीक्षक नवले व नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत इतर अधिकारी व अंमलदार कोपरखैर्य पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०२/०३/२०२४ रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली

संबंधित पोस्ट