समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या भूमी अभिलेख अधिकारी मंगल गवळी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा ! वंचित बहुजन आघाडीची मागणी!
७ मार्चला मोर्चाचे आयोजन!..
नवी मुंबई -समाजा समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून आपला मनमानी कारभार चालवणाऱ्या भूमी उपाधीक्षक मंगल गवळी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा ! ..अन्यथा ७ मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीतर्फे आक्रोश मोर्चा काढला जाईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे आंबेगाव तालुका उपाध्यक्ष पंकज भाऊ सरोदे यांनी डीवायएसपी यांना निवेदन देऊन दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सुनील शांतीलाल बळगट राहते निमगाव सावा स्थानिक रहिवासी आहेत भूमी अभिलेख उपाध्यक्षिक मंगल गवळी यांच्या चुकीच्या निर्णय मुळे जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम चालू आहे, राहत्या घरचा सिटी सर्वे नंबर १९० याची मोजणी मोरो नं. २७७/२०१४व मोरो नं.२७७/२०२१, करण्यात आली असून विरुद्ध बाबाजी निवृत्ती गाडगे व चंद्र ताई बाबाजी गाडगे, यांनी राजकीय व आर्थिक पाठबळ असल्यामुळे व समाजाचे संख्याबळ मोठ्या प्रमाणात असल्याने मोजणी मोरो नंबर ९०१/२०२३ दिनांक २५/०७/२०२३ या दिवशी जाणीवपूर्वक चुकीची मोजणी भूमी अभिलेख उपअधीक्षक मंगल गवळी यांच्या सांगण्यावरून केली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आला आहे
या ठिकाणी हिंदू मुस्लिम राहत असताना तेढ निर्माण करायचं काम हे भूमी अभिलेख उपाधीक्षक यांनी केले आहे.
सुनील शांतीलाल बळगट यांनी दिनांक २७/७/२०१३ रोजी उपाधीक्षक भूमि अभिलेख जुन्नर यांना तक्रारी अर्ज दिला व दोन्ही मोजणीची चौकशी केल्याशिवाय प्रत देण्यात येऊ नये याबाबत बळगट यांनी उपाधीक्षक भूमी अभिलेख जुन्नर यांची वरांवर भेट घेऊन विनंती केली असून मनमानी उडवाउडवीचे उत्तर दिले जात होती
दरम्यान बळकट यांनी माहिती अधिकाराचा वापर करून सुद्धा कोणत्याही पत्राचं योग्य ते उत्तर त्यांना दिले गेले नाही. जिल्हा भुमिअभिलेख पुणे कार्यालय चे अधिकारी सूर्यकांत मोरे यांनी सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी यासाठी भूमी अभिलेख उप अधीक्षक जुन्नर मंगल गवळी यांना आदेश देऊन देखील त्या आदेशाला केराची टोपली दाखवत त्यांचा आदेश देखील केराच्या टोपलीत टाकला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला न जमता माजलेल्या उपभूमी अधीक्षक मंगल गवळी यांनी २८/०८/२०२४ पर्यंत योग्य ते निर्णय घेतला नाही वंचित बहुजन आघाडी च्या वतीने भूमी अभिलेख कार्यालय जुन्नर या ठिकाणी सत्याची लढाई लढण्यासाठी येता ०७ मार्च २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता "जन आक्रोश आंदोलन" छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे पंकज सरोदे (आंबेगाव तालुका उपाध्यक्ष) संभाजी राजे राजगुरू(आंबेगाव तालुका सचिव), नाफिस भाई शेख (आंबेगाव तालुका संघटक) व इतर कार्यकर्त्यांनी दिला आहे.
पुणे जिल्ह्याचे भूमीअभिलेख अधीक्षक अधिकारी सूर्यकांत मोरे यांच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवणाऱ्या जुन्नर विभागातील भूमी उपाधीक्षक मंगल गवळी यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी तर्फे काढला जाणाऱ्या आक्रोश मोर्चात बौद्धजन सहाय्यक संघ आंबेगाव तालुका पश्चिम या संघाचा आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या गवळीवर तात्काळ गुन्हा नोंदवावा अशी देखील आम्ही मागणी करत आहोत
बौद्धजन सहाय्यक संघ आंबेगाव तालुका पश्चिम
शंकर वाघमारे सेक्रेटरी
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम