कोपरखैरणे पोलिसांची कारवाई विविध गुन्ह्यातील आरोपींना केले गजाआड !

नवी मुंबई - कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी नुकताच चार्ज घेतलेला आहे त्यानुसार त्यांनी कोपरखैरणेतील गुन्हेगारी क्षेत्राचा बीमोड करण्यासाठी पाऊले उचलली असून विशेष पथकाची स्थापना केलेली आहे या पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी जबरी चैन चोरीचा तांत्रिक तपास करून गुप्त बातमीदाराच्या माहिती नुसार सराईत गुन्हेगाराच्या मुस्क्या आवळण्यात यश प्राप्त केले आहे या आरोपीचे नाव मोहम्मद अफाक इशाक शेख वय वर्ष (२८) असे असून राहणार घनसोली असे आहे आरोपीकडून मोटरसायकलसह  सोन्याचे ५ ग्राम ५ मिलीग्राम मंगळसूत्र असा एकूण दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपीवर अशाच प्रकारचे यापूर्वी दोन गुन्हे दाखल असून त्याला अटक करण्यात आली होती

दुसऱ्या घटनेमध्ये कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजी एक्झिटिका या बिल्डिंग समोरील झोपडपट्टीत २० किलो २०० ग्राम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून आरोपी अनिल उमराव शिंदे वय वर्षे (४५) सौ रादुबाई  बालभीम काळे वय वर्षे (४०) सौ सीमा शिवाजी पवार वय वर्ष (३३) सौ सुरेखा अतुल शिंदे वय वर्ष (३०) यांच्याकडून ३ लाख ६३ हजार ६०० कृपया किमतीचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे यापैकी तीन महिला आरोपी व एक पुरुष आरोपीला अटक करण्यात आले आहे एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत अटक असलेल्या आरोपींना कोर्टाने १२तारखेपर्यंत पोलीस कोठडी  दिलेली आहे तिसऱ्या घटनेमध्ये कोपरखैरणे नवी मुंबई येथे गटारीचे बांधकाम करिता आणलेले  ५०० किलो वजनाचे जीएसडब्ल्यू स्टील चोरी बाबत कोपरखणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती पोलिसांनी एकूण १७ सीसीटीव्ही फुटेज चेक करून शोध घेतला असता आरोपी  नजीर खान वय वर्ष (२८) व गुजरात मेराज खान या आरोपींना मुद्देमालाचा अटक केली आहे

दरम्यान : सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे पोलीस आयुक्त संजय येनपुरे अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे पोलीस उपायुक्त परिमंडळ १ वाशी नवी मुंबई पंकज डहाणे सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश गावडे, यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण ,पोलीस निरीक्षक विवेक दाभोळकर, पोलीस निरीक्षक सागर जाधव, रमेश जाधव,संजय जाधव,संतोष आव्हाड जितेंद्र कोल्हे, सतीश भोसले, संतोष चिकने, विनोद कांबळे सचिन भालेराव, दिनेश पाटील, गोरख कोकाटे, विकू पवार, ज्ञानदेव गरजे,, भवार पालवे पवार गायकर, पाडले, काळे, कांबळे भिसे बुद्धवंत, बिराडे भांगरे,शिंदे पवार कातोरे, केदार नेहे जंगम यांनी सहभाग घेऊन कारवाई यशस्वी केली

संबंधित पोस्ट