जन मेट्रो साप्ताहिकाचे संपादक कुंदन पाटील यांना नवी मुंबईमध्ये दर्पणकार पुरस्कार प्रदान !

नवी मुंबई -गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारी क्षेत्रामध्ये पत्रकारिता करत असणारे व जन्म मेट्रो या साप्ताहिकाचे संपादक कुंदन पाटील यांना नवी मुंबई बेलापूर येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाच्या औचित्य साधून दर्पण कार  पुरस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने प्रदान करण्यात आला.

 कुंदन पाटील यांनी वाडा मोखाडा जव्हार पालघर तलासरी विक्रमगड कुडूस भिवंडी इत्यादी पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आपल्या पत्रकारितेचा आवाज बुलंद करून आदिवासी बांधवांच्या न्यायासाठी आपली लेखणी चालवली आहे. त्या लेखणीतून अनेक आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी कुंदन पाटील हे अग्रेसर राहिलेले आहेत.

 दरम्यान बाळशास्त्री जांभेकर यांनी १९३२ रोजी दर्पण नावाचे पहिले मराठी वर्तमानपत्र सुरू केले होते त्याच वर्तमानपत्राच्या नावाने पत्रकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने पुरस्कार देण्यात आला आहे सदर पुरस्काराचे मानकरी  दैनिक आदर्श महाराष्ट्र नवी मुंबई प्रतिनिधी पत्रकार सुनील गायकवाड महाराष्ट्र  गुन्हे तपास या साप्ताहिकाचे संपादक सुभाष जाधव,पत्रकार अस्तेआलम मीर, अक्षराज दैनिकाचे ठाणे जिल्हा प्रतिनिधी वरिष्ठ पत्रकार जी के पोळ, संजय वाघमारे, कुंदन पाटील, भूषण औसरकर, पत्रकार विष्णू भुरे, इत्यादी पत्रकारांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण यांच्या हस्ते दर्पणकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सत्याच्या मार्गाने पत्रकारिता केल्यास नक्कीच आपल्या पत्रकारितेची दखल कोणत्यातरी सामाजिक संस्था घेत असते म्हणून आपली लेखनी ही गोरगरीब दुबळ्या आणि अन्यायग्रस्त पीडित नागरिकांच्या पाठी उभी राहिली पाहिजे हा पुरस्कार मला दिला गेल्याने माझ्या कामाची जबाबदारी वाढली आहे..

कुंदन पाटील

जन मेट्रो साप्ताहिक संपादक

संबंधित पोस्ट