दिवसा घरफोडी करणाऱ्या ५ सराईत गुन्हागारांच्या सीबीडी पोलिसांनी आवळल्या मुस्क्या! ९ लाख १२ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त !

नवी मुंबई-सीबीडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मध्ये दिवसा घरफोडी करून पळ काढणाऱ्या सराईत ५ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे 

या आरोपीकडून एकूण  ९ लाख १२  किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या आरोपींची नावे सद्दाम हुसेन जमालुद्दीन खान वय वर्ष (३५) राहणार दत्तकृपा अपरमेंट शिळफाटा (२) निलेश राजू लोंढे वय वर्ष ( २२ ) राहणार  चुनाभट्टी (३) संजय रत्नेश कांबळेवय वर्षे (४२) ( ४)गुड्डू रामधनी सोनी वय वर्ष (३९) राहणार घाटकोपर(५) विकी राजू लोंढे वय वर्ष (२०) राहणार चुनाभट्टी असे आरोपींची नावे आहेत या आरोपींनी २०६ ग्राम वजनाचे सोने १० हजार रुपये रोख असा एकूण ८ लाख ३२ हजार ‌  इतक्या स्वरूपाची घरफोडी करून पसार झाले होते. 

याबाबत सीबीडी पोलिसांनी या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सुमारे २०० च्या वर सीसीटीव्ही फुटेज चेक करून  आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली   सीसीटीव्ही फुटेज वरून अज्ञात आरोपी घरफोडी करत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नाशिक शिर्डी सातारा कोल्हापूर पुणे पालघर परिसरात शोध घेत असता आरोपी गुजरात राज्यात पळून जाण्याच्या स्थितीमध्ये असतानाच महाराष्ट्र गुजरात सीमेवर अच्छाड तालुका पालघर येथून त्यांना अटक केली आहे.

दरम्यान :आरोपीकडून २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आयफोन ऑटो रिक्षा लोखंडी कंटाळवाणी हे साहित्य जप्त करण्यात सीबीडी बेलापूर पोलिसांना यश आलेले आहे

या कामी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, परिमंडळ एक उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल गायकवाड, सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश डांबरे पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाघ, पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार पठाण, पोलिस हवलदार भोकरे, फड, बंडगर वाघ साबळे, पाटील, या पथकाने यशस्वी कारवाई करून घरफोडी करून पसार असणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद केले आहे.

संबंधित पोस्ट