महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या मानद सरचिटणीस पदी डॉ. हनुमंत पाटील यांची नियुक्ती करा!
माथाडी कामगार कार्यकर्त्यांची मागणी !
नवी मुंबई -महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या मानद सरचिटणीस पदी डॉक्टर हनुमंत पाटील यांची निवड करा अशी मागणी माथाडी कामगार कार्यकर्त्याकडून होत आहे.
डॉक्टर हनुमंत पाटील हे माथाडी कामगार ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते निवृत्त झालेले आहेत. माथाडी कामगारांच्या समस्या आणि जीवनमान उंचावण्यासाठी माथाडी कामगार कार्यकर्त्यांना कायमस्वरूपी कार्यालयात असणारा व त्यांचे प्रश्न सोडवणारा हक्काचा माणूस म्हणून डॉक्टर हनुमान पाटील यांच्याकडे माथाडी कामगार कार्यकर्ते आपल्या हक्काचा माणूस म्हणून पाहत आहेत.
दरम्यान: माथाडीचे आराध्य दैवत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे डॉक्टर हनुमंत पाटील हे ज्येष्ठ सुपुत्र असून ते कोणत्याही राजकीय आणि सरकारी पदावरती कार्यरत नसल्याकारणाने तेच खऱ्या अर्थाने माथाडी कामगाराला आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा माथाडी कामगारांनी व्यक्त केली असून माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी युनियन ही भविष्यात राजकीय आखाडा होऊ नये म्हणून एक उच्चशिक्षित आणि ज्ञानी व्यक्तीचा माथाडी कामगारांना नक्कीच फायदा होईल या हेतूने महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल युनियनच्या मानद सरचिटणीस पदी डॉक्टर हनुमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम