अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या नवी मुंबई अध्यक्षपदी डॉक्टर राजश्री पाटील यांची नियुक्ती !
नवी मुंबई - सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या व माथाडी कामगारांचे आराध्य दैवत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची सून राजश्री पाटील यांची अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.
राजश्री पाटील या डॉक्टर असून अनेक सामाजिक संस्थेमध्ये समाज उपयोगी कामासाठी व कल्याणकारी कामासाठी त्यांचा सतत पुढाकार असतो त्यांची निवड अखिल भारतीय महिला मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांनी केली असून त्या नियुक्तीचा कालावधी ३ वर्ष इतका राहणार आहे राजश्री पाटील यांची निवड अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी झाल्याने नवी मुंबईत संघटनेला बळ प्राप्त होईल असा विश्वास महिला वर्गातून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान: स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या घराण्याला राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातला वारसा लाभला असल्याकारणाने डॉक्टर राजश्री पाटील यांनी नवी मुंबई विभाग अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम