कोपरखैरणे येथील स्थानिक मच्छी विक्रेत्यांना न्याय द्या ! अन्यथा आंदोलन करणार-संजय शिर्के पाटील यांचा इशारा !

नवी मुंबई - कोपरखैरणे विभागात स्थानिक भूमिपुत्र नागरिकांना रोजगार निर्मितीचा व त्यांच्या रोजी रोटीचा मुख्य व्यवसाय म्हणून मच्छी विक्री करणे हा पारंपारिक दृष्ट्या व्यवसायाचे साधन आहे. मात्र हाच व्यवसाय परप्रांतीय नागरिकांनी अनधिकृत रित्या फुटपाथ आणि फेरी दरम्यान करत असल्याने स्थानिक भूमिपुत्र नागरिकांच्या व्यवसायावर गदा आलेली असून उपासमारीची वेळ देखील  भूमिपुत्र नागरिकांच्या वरती आलेली आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना  सेनेचे सैनिक संजय शिर्के पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊन यापुढे परप्रांती आणि बांगलादेशातील नागरिक अनाधिकृतपणे इतरत्र फुटपाथ किंवा फेरी दरम्यान मच्छी विक्रेतेचा व्यवसाय केल्यास मनसे स्टाईलने  धडा शिकविला जाईल अशी भूमिका घेतली आहे त्यासाठी मनसेच्या वतीने शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे विभाग अध्यक्ष चंद्रकांत डांगे शाखाध्यक्ष सूर्यकांत मोरे उपशहराध्यक्ष सोनिया दनके फातिमा मुजावर प्रियंका शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोपरखैरणे स्थानिक पोलीस स्टेशन व कोपरखैरणे प्रभाग समिती प्रभागअधिकारी यांना  परप्रांतीय बांगलादेशी मच्छी विक्रेत्यांचा बंदोबस्त करून त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशा स्वरूपाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने देऊन मागणी करण्यात आलेली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका तर्फे स्थानिक मच्छी विक्रेत्यांना मच्छी व्यवसाय करण्यासाठी काही जागा निश्चित केल्या आहेत व त्या ठिकाणी पालिकेने शेड देखील बांधलेले आहेत मात्र परप्रांतीय बांगलादेशी मच्छी विक्रेत्यांनी घरोघरी आणि फुटपाथावर मच्छी विक्री केल्यास मासळी बाजारात कोणत्याच नागरिक जात नाही त्यामुळे या स्थानिक भूमिपुत्र मच्छी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.


    

संबंधित पोस्ट