अनधिकृत वाहने पार्क करण्यासाठी सिडकोने बुद्ध विहारावर कारवाई केली का? संतप्त बौद्ध समाजाचा सिडकोला सवाल
नवी मुंबई - घणसोली रोड मध्ये बौद्ध समाजासाठी बुद्ध विहार असावे या मागणीसाठी गेली पंधरा वर्षे घणसोली विभागातील बौद्ध जनता सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत आहे गत २०१८ साली घणसोली विभागातील तीन बुद्ध विहार महानगरपालिकेने निष्कासित केली होती. तदनंतर घणसोली नोड मध्ये एकमेव असलेल्या बुद्धघोष बुद्ध विहार या विहारावर देखील ३१ मे रोजी सिडको प्रशासनाने निष्कासनाची कारवाई केली. कारवाई केलेल्या जागेवर आज बेकायदेशीर पणे वाहने उभे केली जात आहेत. यामुळे बौद्ध समाजात असंतोष निर्माण झाला आहे.
घणसोली तील बौद्ध समाजाच्या भावना दुखवून सिडकोने कारवाईची घाई का केली? नवी मुंबईत अनेक बेकायदेशीर बांधकाम असताना बुद्ध विहारावर कारवाई हा विषय सिडकोने प्रतिष्ठेचा केला होता का? असा संतांचा सवाल बौद्ध बांधवांच्या वतीने विचारण्यात येत आहे
सिडको ने बुद्ध विहार ज्या ठिकाणी होते ती जागा समर्थ को-ऑपरेटिव्ह सोसायटीला देऊ केली बौद्ध बांधवांच्या जागेवरती बुद्ध विहार असताना देखील सिडकोने तोडक कारवाई केली आता त्या जागेवर अनधिकृत पार्किंग सुरू केल्याचे चित्र दिसत आहे,
सचिन कटारे
प्रवक्ता नवी मुंबई
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम