
शासकीय अधिकाऱ्यांकडून खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांसह दोन पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल !
नवी मुंबई - माहिती अधिकाराचा गैरवापर करून शासकीय अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वेठीस धरून त्यांच्याकडे हप्ते वसुली करण्याच्या घटना दिवसान दिवस वाढत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे अशीच घटना कळवा येथील सह दुय्यम निबंधक वर्ग दोन ठाणे येथे कार्यरत असलेले अधिकारी जयवंत दामोदर जोपले वय वर्ष ( ५०) यांच्या बाबतीमध्ये घडले असून त्याने थेट खंडणी विरोधी पथकाकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली असता पोलिसांनी माहिती अधिकार कार्यकर्ता व दोन पत्रकार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे.
आरोपी सुभाष पाटील हा माहिती अधिकार कार्यकर्ता असून संतोष हिरे नवस्फूर्ती साप्ताहिक व समसाद पठाण साप्ताहिक लोक राजकारण या साप्ताहिकात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्यावर कळवा पोलीस ठाण्यात भादवि कलम ३८४,३८५,३८६,३८७,५०७,३४, याप्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत
याबाबत हकीकत अशी की जयवंत जोपळे हे कळवा विभागात सह दुय्यम निबंधक अधिकारी वर्ग 2 या पदावर कार्यरत आहेत.
आरोपींनी तुम्ही केलेल्या कामाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचले असून सदरची माहिती आम्ही वर्तमानपत्रांमध्ये छापतो त्यानुसार तुम्हाला या कार्यालयात काम करू दिले जाणार नाही अशा प्रकारच्या धमक्या दिल्या होत्या त्या बदल्यात आरोपींनी जयवंत जोपळे यांच्याकडे दोन लाखाची रक्कम मागितली होती. याबाबत जोपळे यांनी खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली असता खंडणी विरुद्ध पथकाने सापळा रचून आरोपींना सदाची रक्कम घेताना रंगेहात पकडले आहे
दरम्यान; जयवंत जोपळे हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या तालुक्यात कार्यरत असताना यापूर्वी देखील आरोपींनी खोट्या नाट्य तक्रारी करून जयवंत जेपळे यांच्याकडून खडणी स्वरूपात काही रक्कम घेतल्याचे जोपळे यांनी पोलिसांना सांगितले आहे. याबाबत अधिक तपास कळवा पोलीस स्टेशन करत आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम