कंपन्या मधील केमिकल युक्त दूषित पाणी नदीपात्रात सोडल्याने रोडपालीचे ग्रामस्थ त्रस्त !

नवी मुंबई - पनवेल तालुक्यातील तलोजा एमआयडीसी परिसरात कार्यरत असलेल्या केमिकल युक्त  कार्यरत असणाऱ्या  कंपन्या  दूषित पाणी नदीपात्रात सोडत असल्याने  रोडपाली ग्रामस्थांना याचा नहाक त्रास सोसावा लागत आहे.  

रोड पाली गाव तालुका पनवेल जिल्हा रायगड  नदीच्या पात्रात केमिकल युक्त पाणी केमिकल कंपन्या सोडत असल्याकारणाने या गाव परिसरात घाणीचे साम्राज्य व वाढते प्रदूषण वाढले आहे त्यामुळे तिथल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे यासाठी दलित पॅंथर नेते रायगड जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ गायकवाड यांनी वरिष्ठ अभियंता प्रदूषण विभाग कळंबोली यांना निवेदन देऊन तलोजा परिसरात कार्यरत असलेल्या केमिकल युक्त कंपन्यावर त्वरित कारवाई करून नागरिकांच्या आरोग्या संदर्भात खेळ करू नये त्यासाठी उपयोजना अखाव्यात   व नदीपात्रामध्ये ज्या केमिकल युक्त कंपन्या दूषित पाणी सोडत आहेत अशा कंपन्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे 

दरम्यान :वारंवार लेखी अर्ज देऊन देखील प्रदूषण विभाग कोणत्याच प्रकारची कारवाई करत नसल्याचे चित्र समोर आले आहे जर प्रदूषण विभागाने योग्य दखल घेतली नाही तर रोड पाली ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडले जाईल असा इशाराही मनोज भाऊ गायकवाड यांनी दिला आहे

संबंधित पोस्ट