जुईनगर मध्ये बहुजन मुक्ती पार्टीतर्फे बहुजन शासक बनो अधिवेशन संपन्न !
नवी मुंबई - देशामध्ये लोकशाही धोक्यात असल्याकारणाने बहुजनाने शासक बनले पाहिजे याकरिता बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यामध्ये बहुजन शासक बनो जिल्हास्तरीय अधिवेशने सुरू केलेली आहेत त्यातलाच एक भाग म्हणून नवी मुंबई बहुजन मुक्ती पार्टीचे अध्यक्ष दत्ताजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जुईनगर येथील हिमालय मूलगंध कुट्टी बुद्ध विहार या ठिकाणी जिल्हास्तरीय अधिवेशन ठेवण्यात आले होते या अधिवेशनाचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे यांच्या हस्ते करण्यात आले.या अधिवेशनाला प्रमुख उपस्थिती म्हणून संभाजी ब्रिगेडचे नवी मुंबई अध्यक्ष सुभाष सावंत व दलित पॅंथरचे पत्रकार सुनील गायकवाड उपस्थित होते.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे कार्याध्यक्ष संजय माळी, युवा अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी बाबासाहेब भवरे, सचिव धम्मपाल इंगवले प्रेमदास तायडे, राहुल शेळके,प्रशांत गायकवाड, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
दरम्यान: या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेम कुमार गुप्ता यांनी बहुजन शासक बनण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपयोजना आखायला पाहिजेत. सरकार ओबीसी आणि मराठा मध्ये कशा प्रकारचे अविश्वासाचे वातावरण तयार करून दोन्ही समाजात जातीय तेढ निर्माण करत भांडण लावण्याचे काम करतात याबाबतची माहिती दिली व देशातल्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या हजारो समस्या निर्माण झाले आहेत याबाबतचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन देखील यावेळी केले..
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम