नवी मुंबई लाच लुचपत विभागाची कारवाई मुरबाड येथे कार्यरत असलेल्या लोकसेवकाला ५० हजाराची लाच घेताना पकडले!

नवी मुंबई -जमिनीच्या विक्री व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ७० हजार रुपयाची लाच मागणाऱ्या लाचखोर महसूल मंडलाधिकारी म्हसा विभाग येथे कार्यरत असणाऱ्या  लोकसेवकाच्या मुस्क्या आवळण्यात नवी मुंबई लाच लूचपत विभागाच्या पथकाला यश प्राप्त झाले आहे. या लाचखोर लोकसेवकचे नाव सुधीर बोबे  (५४)असून तो मुरबाड तालुक्यातील म्हसा विभागात मंडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत 

याबाबत हकीगत अशी की तक्रारदार आदिवासी असून त्याची मिळकत मालमत्ता गट नंबर १२९ मधील ०.५३.१० याप्रमाणे असून मिळकत खरेदी आणि विक्री करणारे दोघे आदिवासी आहेत मालमत्ता हस्तंतरित करण्यासाठी जिल्हाधिकारी ठाणे यांची परवानगी घ्यावी लागत असल्याने  यासाठी  खरेदी विक्री संदर्भातला व जमिनी संदर्भात चा अहवाल सकारात्मक रित्या पाठवायचा असल्यास ७० हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी लोकसेवक सुधीर बोबे यांनी तक्रारदाराकडे केली होती त्यादरम्यान तक्रारदार आणि लोकसेवक बोबे यांच्या संभाषणाची लाच लुचपत विभागाने खातरजमा करून लोकसेवक सुधीर बोबे व तक्रारदर यांच्या बोलण्यातून साठ हजार इतक्या रक्कमे वर तडजोड झाल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदाराने सदरची तक्रारार लाच लुचपत विभागाकडे दाखल केल्या असल्याने   लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून लोकसेवक बोबे यांना ५० हजार इतक्या रकमेची लाज घेताना रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे.

दरम्यान सदरची कारवाई यशस्वी करण्यासाठी सापळा पर्यवेक्षण अधिकारी  शिवराज म्हेत्रे पोलीस उपअधीक्षक एसीबी नवी मुंबई सापळा पथक - पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोह पवार , पोना/ताम्हणेकर पोना/अहिरे, मपोना/विश्वासराव, मपोना सावंत पोशि/चव्हाण, पोशि/माने , पोहचालक /गायकवाड यांनी मेहनत घेतली

संबंधित पोस्ट