
डंपरच्या धडकेने मोटर सायकल स्वार जागीच ठार !..
नवी मुंबई -भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरच्या धडकेत मोटर सायकल स्वार चालक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशन समोर घडली तर त्याचा जोडीदार थोडक्यात सुदैवाने बचवला असून किरकोळ जखमी झालेला आहे या घटनेत मृत्यू पावलेल्या मोटर सायकल स्वार चालकाचे नाव मुकुंद सुकलाल पवार वय (४०) वर्ष असे असून ते नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेत तुर्भे डेपो येथे चालक या पदावरती कार्यरत होते.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवा कामाची वेळ समाप्त झाल्यानंतर मुकुंद पवार हे संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान आपल्या मित्रा सोबत घराच्या दिशेने निघाले होते ठाणे बेलापूर रोड रबाळे चा उताराच्या दिशेने मुकुंद पवार यांनी आपली मोटरसायकल डाव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला तेवढ्या वेळातच भरधाव वेगाने अशोक लेलँड कंपनीचा डंपरने मुकुंद पवार यांच्या मोटरसायकला जोरदार धडक दिली त्यात मुकुंद पवार यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेत अपघातास कारणीभूत ठरलेला डंपर चालक फरार असून रबाळे पोलीस या डंपर चालकाचा शोध घेत आहेत
अधिक तपास रबाळे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल गरड करीत आहेत
ठाणे बेलापूर हवे रोड रस्ते बरोबर नसल्याकारणाने त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात छोटे मोठे खड्डे पडलेले आहेत त्यातच दुचाकी वाहन चालकाचा तोल जाऊन अशा प्रकारचे अपघात घडत असतात व निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे संबंधित विभागाने रोडवरील खड्डे बुजवण्याचे कार्य हाती घेतल्यास असे अपघात होणार नाही
समाजसेवक व पोलीस पंच
मोहन सोनवणे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम