घणसोलीत स्वातंत्र दिनानिमित महिला सक्षमीकरण अभियान संपन्न !

नवी मुंबई - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून घनसोली येथील किड्स वर्ल्ड प्री स्कूल सेक्टर १ या ठिकाणी महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

 कार्यक्रमांमध्ये महिलांना विविध प्रकारच्या शासनाच्या योजना लघुउद्योग मार्गदर्शन  व्यक्तिमत्व विकास मन: भेद आणि मतभेद या विषयावर महत्वपूर्ण चर्चा झाली व महिला सक्षमीकरणाबाबत माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रतिभा शिवशरण:-प्राध्यापिका प्रतिभा शिवशरण किड्स वर्ल्ड प्रमुख वैद्यकीय अधिकारी माथाडी हॉस्पिटल ट्रस्ट नवी मुंबई या ट्रस्टच्या डॉक्टर राजश्री पाटील, नागमणी कामगार संघटनेचे प्रमुख मारुती माने यशवंतराव चव्हाण फाउंडेशन अध्यक्ष संजय सावंत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दशरथ भाई चव्हाण, माजी नगरसेविका उषाताई पाटील, समाजसेविका मीनल म्हापणकर, ज्येष्ठ कवी सावित्रीबाई बहुउद्देश्य महिला विकास संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष शिरवले भीम आर्मी चे रत्नागिरी व महाराष्ट्र नामा न्यूज उपसंपादक सचिन जाधव, दलित पॅंथर चे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख तथा ठाणे जिल्हा अध्यक्ष सुनील गायकवाड यांची उपस्थिती लाभली

दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन सुनिता शेडगे प्रदेश सचिव सावित्रीबाई बहुउद्देशीय महिला विकास संस्था  माधवी पाटील   (समाजसेविका) यांनी केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापिका प्रतिभा शिवशरण देशभक्तीपर सुंदर गीत सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाला महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

संबंधित पोस्ट