बार मालकाकडून ५० हजाराची खंडणी मागणाऱ्या खंडणीखोरा विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

नवी मुंबई - एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीचा एडिटर असल्याचा बनाव करत कोपरखैरणे येथील नटराज बार मालकाकडून ५० हजाराची खंडणी मागणाऱ्या खंडीनी खोराविरुद्ध कोपरखैरणे पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 

 या खंडणीबहाद्दराचे नाव सावंत असे आहे (पूर्ण नाव  माहिती नाही ) त्याचे मध्यस्थी करणारे राजू छगन पटेल व जैन या आरोपींचा कोपरखैरणे पोलीस शोध घेत आहेत  कोपरखैरणे पोलिसांनी राजेंद्र दशरथ साळुंखे वय वर्षे (३४) राहणार निर्मला नगर बांद्रा पूर्व याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

याबाबत माहिती अशी की कोपर खैरणे  विभागात नटराज नावाचे बार अँड रेस्टॉरंट आहे या रेस्टॉरंटमध्ये अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ शूटिंग कॅमेऱ्यामध्ये कैद केले असल्याची माहिती सावंत यांनी बार चालक सुरेश पुजारी यांना दिली

 जर हे अश्लील व्हिडिओ वृत्तवाहिनीवर चालवायचे नसल्यास ५० हजार देण्याची मागणी एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीच संपादक असल्याचे भासवून केली. त्यानुसार बारमालक सुरेश पुजारी यांनी एडिटर सावंत यांच्या सांगण्यावरून ऑनलाईन स्वरूपात  ३० हजार इतके रक्कम हिमांशू सिंग यांच्या खात्यावरती  ट्रान्सफर केली उर्वरित रक्कम घेण्यासाठी आरोपी सावंत यांनी राजेंद्र साळुंखे नामक इसमाला कोपरखैरणे येथील नटराज बार येथे  घेण्यास पाठवले हॉटेल मालक सुरेश पुजारी यांना संशय आल्याकारणाने त्यांनी पोलीस स्टेशनला रीतसर माहिती दिली पोलिसांनी राजेंद्र साळुंखे या इसमाला ताब्यात घेतले आहे याबाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस आरोपी सावंत व त्याच्या इतर साथीदाराचा कसून तपास करीत आहेत 

पुढील तपास कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जगताप करीत आहेत

संबंधित पोस्ट