
सामाजिक कार्यकर्त्या निर्मला भानुसे यांना समाज रत्न पुरस्कार प्रदान !
नवी मुंबई - कोल्हापूर जिल्ह्यात सामाजिक कार्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत असलेल्या मुक्काम चिपरी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ निर्मला भानुसे यांना सावित्रीबाई बहुउद्देशीय विकास संस्था या संस्थेच्या वतीने समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्राचे माजी जलसंपदा मंत्री तथा आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते व सावित्रीबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था या संस्थेचे अध्यक्ष गीताताई चापके सचिव मयुरी मोरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नवी मुंबई वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात त्यांना प्रदान करण्यात आला
दरम्यान: निर्मला भानुसे या गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असे कार्य करत असून त्यांनी ग्रामीण भागामध्ये बचत गटाची बांधणी मोठ्या प्रमाणात केलेली आहे कॅन्सर ग्रस्त रुग्णासाठी त्या कार्यरत आहेत विविध आंदोलनात त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे अन्याय अत्याचारच्या विरोधात त्या सातत्याने लढा उभारत आहेत
समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार सौ भानुसे यांना दिला गेल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे..
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम