
लाच लुचपत विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करत सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरावर जबरी दरोडा !.. २५ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त
रबाळे पोलिसांनी ११ आरोपींच्या मुस्क्या आवळल्या !
नवी मुंबई - ऐरोली विभागात राहणाऱ्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरावर लाच लुचपत विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करत जबरी दरोडा टाकल्याची खळबळ जनक घटना घडली आहे या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे नाव कांतीलाल दादू यादव असे असून ते सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होते.
याबाबत माहिती अशी की दिनांक २२/७/२०२३ दुपारी साडेतीन ते पाच या वेळात सेवानिवृत्त अधिकारी कांतीलाल यादव यांच्या राहत्या घरी ६ अनोळखी इसम अचानकपणे आले सदर इसमाने आम्ही लाच लुचपत विभागाचे अधिकारी असून आपल्या घराची झडत घ्यायची आहे अशी कारण देत खऱ्या अधिकाऱ्याप्रमाणे हाव भाव करत दमदाटी सुरू केली त्यानुसार भीतीपोटी सेवानिवृत्त अधिकारी यादव यांनी आपल्या घराची झडती घेण्यास परवानगी दिली. या तोतया लाच लुचपत अधिकाऱ्यांनी. कांतीलाल यादव यांच्या घरातील सुमारे ३४ लाख ८५ हजार किमतीचे ऐवज लुटून नेल्याची घटना घडली आहे त्यात रोख रक्कम सोन्याचे विविध दागिने दोन मनगटी घड्याळे व चामड्याची बॅग या वस्तूचा समावेश आहे.
दरम्यान :या गुन्ह्याची उकळ करण्यासाठी रबाले पोलिसांनी विविध पोलीस पथके तयार केले असता केले असता सीसीटीव्ही कॅमेरे व इतर तांत्रिक तपास करून आरोपी दीपक सूर्यकांत कवटीकर वर्षे (४७) राहणार मुकाई चौक रावेत पिंपरी चिंचवड (२) नरेश राजपती मिश्रा (५२) तळेगाव दाभड जिल्हा पुणे (३) रुपेश महेश नाईक वय वर्ष (३२) राहणार गोरेगाव मुंबई (४) सिद्धेश महेश नाईक वय वर्ष(३२) गोरेगाव मुंबई (५) मुस्तफा कल्लू भाई वय वर्ष (४०) (६) विजय लक्ष्मण बारात वय वर्ष (४३) राहणार गोरेगाव (७) देवेंद्र गंगाराम चाळके वय वर्ष (३२) लोणार डोंबिवली (८) किशोर गंगाधर जाधव वय वर्षे (४७) होणार चिकन घर कल्याण (९) झुल्पीकर वली मोहम्मद शेख वय वर्ष (४३) राहणार चिता कॅम्प ट्रॉम्बे (१०) वसीम हमजा मुकादम वय वर्ष (३९) राहणार मुंबई रोड ठाणे (११) आयुब बाबुला खान वय वर्ष (५०) राहणार भायखळा या आरोपींना रबाळे पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता या आरोपीकडून ६ लाख रुपये किमतीची मारुती कंपनीची सियाज कार व ६ लाख किमतीचे सुझुकी कंपनीचे बोलोनो कार १२ लाख ७५ हजार रोख रक्कम रक्कम ५० हजार रुपये किमतीचा एम एम पिस्टल व ०६ काडतुसे असा एकूण २५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त केले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
सदरची कामगिरी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे पोलीस सहआयुक्त l संजय मोहिते वाशी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डी डी टेळे, यांच्या मार्गदर्शनाखाली रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते, रबाळे पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागोजी औटी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पगारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक खरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र दयानंद वनवे,सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मानकुंबरे, पोलीस हवालदार वायगणकर कटके टिकेकर, संकले,वीर, करकाळ, गुंबाड, घुले,देडे, यादव, या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व रबाळे पोलिसांनी केली
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम