महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस कर्मचारी रवी जगदाळे यांचा वाढदिवस साजरा!

नवी मुंबई - नवी मुंबई एपीएमसी पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी रवी जगदाळे यांचा वाढदिवस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून त्यांच्या राहत्या घरी साजरा करण्यात आला. संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष  पत्रकार दशरथभाई चव्हाण यांनी त्यांचे पुढील आयुष्य सुदृढ आणि निरोगी जावो अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रवी जगदाळे हे अत्यंत मनमिळावू आणि प्रामाणिक पोलीस कर्मचारी असून त्यांचा वाढदिवस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने साजरा करत असल्याचे दशरथ चव्हाण यांनी सांगितले यावेळी बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष राजेश जैस्वाल, आगरी कोळी एकता महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ (मामा)  पाटील, पत्रकार सुनील गायकवाड कोपरखैरणे पोलीस कर्मचारी शिवाजी पाटील, यांच्यासह इत्यादी मित्र मंडळ उपस्थित होते

संबंधित पोस्ट