धुवाधार पावसात नवी मुंबईत महिलांनी केला मणिपूर सरकारचा निषेध!.. अनेक सविधानवादी संघटनेचा निषेध मोर्चाला पाठिंबा

नवी मुंबई -  मणिपूर राज्यात झालेल्या सामूहिक अत्याचाराबाबत भारतात ठीक ठिकाणी निषेध मोर्चा  केंद्र सरकार आणि  मणिपूर राज्य सरकारच्या विरोधात सुरू आहे मानवतेला काळीमा फासणारी घटना मणिपूर राज्यामध्ये घडली या घटनेचा निषेध करण्यासाठी नवी मुंबईमध्ये धुवाधार पावसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत सावित्रीबाई बहुउद्देशीय महिला विकास सामाजिक संस्था यांच्या नेतृत्वाखाली  निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन केंद्र सरकारचा आणि मणिपूर राज्य सरकारचा जाहीर निषेध केला.

दरम्यान: सदरचा मोर्चा डी मार्ट छत्रपती शिवाजी महाराज चौक येध पर्यंत लॉंग मार्च काढण्याची तयारी आयोजकाने केली होती मात्र कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले गोपनीय शाखेचे संजय जाधव संतोष आव्हाड  हे भर पावसात भिजून आयोजकांना व्यवस्थित समजावून आपण लॉक मार्च मोर्चा न करता तुमचा संविधानिक पद्धतीचा निषेध छत्रपती शिवाजी महाराज चौक  या ठिकाणी करावा अशी भूमिका व सूचना केल्याने आयोजकाने सदरचा लॉंग मार्च मोर्चा रद्द करून आपला मणिपूर राज्य संदर्भातील सामूहिक अत्याचारा संदर्भातल आक्रोश आणि निषेध छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी या ठिकाणी केला

या आंदोलनामध्ये सावित्रीबाई बहुउद्देशीय महिला सामाजिक संस्थेच्या गीताताई चापके, माधवी सूर्यवंशी, मीना शेळके, मयुरी मोरे, पार्वती दाभाडे, सुनीता शेंडगे, अनुसया कांबळे, शबाना खान,मनीषा खैरे, संतोष शिरवले,  जनशक्ती संघटनेच्या विनिता बर्फे व आनंद स्वरूप फाउंडेशन संघटनेच्या वैशाली घोरपडे

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष डॉक्टर मारुतीराव खुटवड, बहुजन समाज पार्टीचे नवी मुंबई राजेश जयस्वाल, ऑल इंडिया पॅंथरचे दीपक वंजारी, भीम आर्मीचे प्रकाश पाईकराव. मुंबई प्रदेश भीम आर्मीचे अध्यक्ष अविनाश गरुड , बहुजन मुक्ती पार्टीचे संजय माळी ,दत्ताजी गायकवाड रिपाईचे ज्येष्ठ नेते रमेश बोदडे, सविधान वादी नेते प्रल्हाद गवारी,

प्राध्यापक गुलाबराव आराख, सचिन वाघ, सुनिता सपकाळे, खन्ना मॅडम, दादा लादे, मानवता संघटनेचे राजकुमार चंदन, डॅनी डिसूजा, सुयोग बोलोसे आगरी कोळी एकता महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष संतलाल शर्मा, आझाद समाज पार्टीच्य  नेहा ताई शिंदे, व इत्यादी राजकीय व मानवतावादी लोकांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दलित पॅंथरचे पत्रकार सुनील गायकवाड यांनी केले

संबंधित पोस्ट