
नवी मुंबईत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन!येत्या २७ जुलै रोजी मणिपूर महिला अत्याचार घटनेच्या विरोधात विविध संघटना रस्त्यावर उतरणार
नवी मुंबई -कोपरखैरणे सेक्टर दोन येथील संभाजी ब्रिगेड पक्षाच्या कार्यालयात पुरोगामी विचारांच्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मणिपूर येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या संवेदनशील घटनेच्या विरोधात 'जनआक्रोश मोर्चा' तसेच निषेध सभे चे आयोजन करण्याकरिता बैठक बोलवण्यात आली होती.
याप्रसंगी नवी मुंबईतील सावित्रीबाई बहुउद्देशीय महिला विकास सामाजिक संस्था यांच्या नेतृत्वात येत्या गुरुवारी दि २७ जुलै रोजी दुपारी एक वाजता लॉंग मार्च काढून वाशीतील शिवाजी चौक येथे जन आक्रोश मोर्चा तसेच निषेध सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या मोर्चाचे नेतृत्व नवी मुंबईतील महिला संघटना करणार असून संविधान प्रेमी व मानवतावादी पुरोगामी विचारांच्या संघटना व विविध राजकीय पक्ष यात सहभागी होणार आहेत. असे आयोजकांकडून वर्तविण्यात आले.
या बैठकीत प्रामुख्याने सावित्रीबाई बहुउद्देशीय महिला विकास सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा गीता चापके, मयुरी मोरे संभाजी ब्रिगेडचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष शिवश्री डॉ. मारुती खुटवड, सपकाळ ताई, खन्ना मॅडम, रिपाई आठवले गटाचे ज्येष्ठ नेते रमेश बोदडे, शेकाप चे संतलाल शर्मा, बसपाचे जिल्हाध्यक्ष राजेश जयस्वार, शशांक कांबळे, आरपीआय खरात गटाचे प्रतिनिधी मंगेश धुरंदर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नवी मुंबई अध्यक्ष दशरथ चव्हाण, पत्रकार राजू मीर, बामसेफ चे संजय माळी, आदींसह महिला प्रतिनिधी यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी कशाप्रकारे योगदान करता येईल याबद्दल आपले आपले विचार प्रकट केले. विशेष म्हणजे मणिपूर येथील घडलेल्या घटनेची चीड जनमानसात उद्रेकाचे स्वरूप घेत आहे व तो आक्रोश सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवी मुंबईतील दक्ष नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या बैठकीचे सूत्रसंचालन दलित पॅंथरचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पत्रकार सुनील गायकवाड यांनी केले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम