
नवी मुंबईच्या सायबर डिटेकशनची कारवाई ! नोकरीचे अमिष दाखवणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश !..
नवी मुंबई -परप्रांती असलेल्या एका टोळीने महाराष्ट्र राज्यात व इतर राज्यात नोकरीचे आमिष दाखवून धुमाकूळ घालत बेरोजगार युवकांना लुटण्याचा गोरख धंदा सुरू केला होता याबाबतच्या तक्रार नवी मुंबई सायबर डिटेक्शन ला प्राप्त झाल्यानंतर सायबर डिटेक्शनच्या अधिकाऱ्यांनी याबाबत गंभीर दखल घेत परप्रांतीय टोळीला गजाड करण्यात यश प्राप्त केले आहे
याबाबत माहिती अशी की नामांकित कंपनी मध्ये जॉब ऑफर करून त्या कंपनीचा लोगो व ट्रेडमार्कचा वापर करून रजिस्ट्रेशन फी लॅपटॉप करिता फी प्रोसेसिंग फी च्या नावाखाली भारतातील अनेक नागरिकांची फसवणूक करणाऱ्या महाठकाना नवी मुंबई सायबर गुन्हा डिटेक्शनच्या अधिकाऱ्याने त्याच्या वेळीच मुस्क्या आवळून त्यांच्या कारनामाचा पर्दाफाश फास केला आहे
या आरोपींची नावे विशाल उर्फ गुलशन महिंद्र प्रताप सिंग वय वर्ष (३०) राजन उर्फ हर्षित दिनेशकुमार सिंग वय वर्ष (२४) केशवकुमार बाबू प्रसाद सिंग वय वर्ष (२१) असे असून सर्व राहणार नोएडा उत्तर प्रदेश येथील असून त्यांनी महाराष्ट्र राज्यात नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाणे, कोपरखैरणे पोलीस ठाणे ,पुणे शहर लोणीकंद पोलीस ठाणे,पुणे शहर भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, एन सी सी आर पी पोर्टल वरील गुजरात तेलंगण पश्चिम बंगाल झारखंड राजस्थान अशा एकूण सहा राज्यातील तक्रारी नवी मुंबई सायबर डिटेक्शन विभागाने उघडकीस आणले आहेत या आरोपींची एकूण १८ बँक अकाउंट सीझ करण्यात सायबर डिटेक्शनला यश प्राप्त झाले आहे अशी माहिती सायबर डिटेक्शनचे पोलीस अधिकारी गजानन कदम यांनी दिली
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम