
कोपरखैरणे मध्ये संभाजी भिडे यांचा सविधानवादी संघटनेने केला निषेध! संभाजी ब्रिगेड चा सहभाग!
नवी मुंबई - वादग्रस्त वक्तव्य करण्यात प्रसिद्ध असलेले संभाजी भिडे यांच्या कोपरखैरणे मधील अण्णा साहेब पाटील स्मृती या सभागृहात होणाऱ्या सभेला नवी मुंबईतील संविधान वादी राजकीय व सामाजिक संघटनेने जोरदार विरोध करीत संभाजी भिडे मुर्दाबाद संभाजी भिडे परत जा अशा प्रकारच्या गगनभेदी घोषणा देत संभाजी भिडे यांची सभा रोखण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टाळला
संभाजी भिडे यांच्या सभेच्या ठिकाणी सविधान वादी संघटनेने हॉलच्या समोरच दोन्ही बाजूच्या रस्त्यावर ठिय्या मारत आंदोलन केले या आंदोलनात संभाजी ब्रिगेड नवी मुंबई जिल्हाध्यक्ष मारुतीराव खुटवड यांनी देखील सहभाग घेतल्याने व संभाजी ब्रिगेड ने जाहीर पाठिंबा निषेध मोर्चाला जाहीर केल्याने वातावरण अधिकच तापले होते. या निषेध मोर्चाला संविधानवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने पोलिसांना अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्याची वेळ आली मात्र पोलिसांच्या उत्कृष्ट पोलीस बंदोबस्ता-मुळे कोणत्याच प्रकारचा अनुचित प्रकार कोपर खैरणे परिसरात घडला नाही कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी आंदोलन-कर्त्यांना कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आवाहान केल्याने वातावरण वेळीच शांत केले.
दरम्यान या निषेध आंदोलनामध्ये दलित पॅंथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ रायगड जिल्हाध्यक्ष मनोज गायकवाड संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मारुतीराव खुटवड वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष भूषण कासारे वंचित बहुजन नवी मुंबई जिल्हाध्यक्ष शिल्पाताई रणदिवे बहुजन मुक्ती पार्टीचे राजू कांबळे बहुजन समाज पार्टीचे राजेश जयस्वाल आप्पासाहेब थोटे रिपब्लिकन सेनेचे सुनील वानखडे महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई इंगळे ऑल इंडिया पॅंथर नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक वंजारी आगरी कोळी एकता महासंघाचे विश्वनाथ पाटील बहुजन समाज पार्टीच्या नवी मुंबई महिला अध्यक्ष प्रतिभाताई अंभोरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रमेश बोदडे सचिन कटारे विजय कांबळे भीमशक्ती संघटनेचे सुभाष गायकवाड इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संभाजी भिडे यांची सभा कोपरखैरणे विभागात होऊ नये व कोपरखैरणे सारख्या शांतता प्रिय विभागात अशांतता पसरू नये म्हणून आम्ही अनेक राजकीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला पत्र देऊन संभाजी भिडे यांच्या सभेला विरोध दर्शवला होता तरीसुद्धा आमच्या निवेदनाची दखल कोपरखैरणे पोलीस प्रशासनाने न घेतल्याने आम्ही या निषेध आंदोलनाचे आयोजन केले आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम