वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोपरखैरणे वाहतूक विभागाने कसली कंबर !

नवी मुंबई - कोपरखैरणे वाहतूक विभाागला दिवसान दिवस वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी ट्राफिक जाम मोठी डोकेदुखी ठरत असल्याने या ट्रॅफिक जामला आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विश्वास भिंगारदिवे यांनी  ज्या कारणामुळे ट्राफिक जाम होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याचे कारणे शोधत  सेट मेरी स्कूलमध्ये एकूण ३२ शाळेच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन वाहतुकीचे निरासन करण्याच्या सूचना केलेल्या आहेत

 एकाच वेळी शाळेचा विद्यार्थ्यांच्या सुटण्याची वेळ न ठेवता त्या वेळी मध्ये थोड्या प्रमाणात बदल करून विभागातील ट्राफिक जाम समस्या सुटू शकते. एकच वेळी शाळा सुटल्या कारणाने पालकांची गर्दी व वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याकारणाने ट्रॅफिक जामचा फटका अनेक नागरिकांना सहन करावा लागतो त्यामुळे शाळेच्या वेळेमध्ये बदल केल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न नक्कीच सुटल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास वाहतूक निरीक्षक भिंगारदिवे यांनी व्यक्त केला

दरम्यान: शाळेकरी मुलांना विद्यार्थ्यांना शाळेमध्ये सोडण्यासाठी येणाऱ्या खाजगी व इतर बसेस योग्य रीतीने पार्किंग कराव्यात जेणेकरून कोणत्याच वाहतूक कोंडीला अडथळा निर्माण होणार नाही शाळेच्या जवळपास राहत असलेल्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी शक्यतो वाहनाचा उपयोग जवळच्या अंतरासाठी नाही केल्यास बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाहतूक अडथळा निर्माण होणार नाही शाळेचा व्यवस्थापकाने शाळेबाहेर सुरक्षा रक्षक उभे केल्यास शाळे परिसरात वाहतूक कोडीच्या प्रश्न निकाली निघेल याकरिता शाळा  व्यवस्थापकाने सुद्धा लक्ष दिले पाहिजे अशा विविध प्रकारच्या सूचना देऊन मार्गदर्शन भिंगारदिवे यांनी मार्गदर्शन केले

संबंधित पोस्ट