कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांचा वाढदिवस साजरा!

नवी मुंबई - कोपर खैरणे पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांचा वाढदिवस कोपरखैरणे पोलीस ठाण्यात पोलीस बांधव सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला

अजय भोसले हे कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असून त्यांची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पोलीस ठाणे परिसरात ओळख आहे. विभागातील नागरिक भोसले यांना आपल्या हक्काचा अधिकारी या दृष्टिकोनातून पाहत असतात 

दरम्यान: पोलीस म्हटलं की त्यातल्या त्यात वरिष्ठ अधिकारी केबिनमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्याकडे जाणाऱ्या नागरिकांना एक प्रकारची भीती किंवा दडपण निर्माण होत असते मात्र कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी म्हणून अजय भोसले यांची नियुक्ती झाल्यापासून नागरिकांना ती केबिन खऱ्या लोकसेवकाची वाटत आहे अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला पुढील आयुष्य निरोगी सुदृढ आणि चांगल्या रीतीने जाण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवर लोकांनी हजेरी लावली होती.

हा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोलीस ठाण्याचे रोहित काळे संजय जाधव संतोष आव्हाड इतर पोलीस बांधवांनी पुढाकार घेतला

संबंधित पोस्ट