पारनेर तालुक्यातील तरुणांनी एकत्र येऊन विधायक कामासाठी प्रयत्न करा !.बाळासाहेब पडवळ
नवी मुंबई -डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानव विकास संस्था नवी मुंबई आयोजित पारनेर तालुक्याच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते
पारनेर तालुक्यातील जुन्या जाणत्या लोकांनी जे वृक्ष लावले ते वटवृक्ष आज मोठ्या प्रमाणात उभे राहिलेले आहे त्याची चाहुल या सभागृहात दिसत आहे म्हणूनच आज मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात मात्र तरुण मुलांनी आता पुढाकार घेऊन पारनेर तालुक्याच्या समाजभिमुख कामासाठी पुढाकार घ्यावा यातून नवीन पिढीला आपल्या कार्याचे आणि मेहनतीचे आशाचे किरण दिसेल.
पारनेर तालुक्यात तीन संघटना कार्यरत आहेत या तिन्ही संघटनेने एकत्र येऊन ज्याप्रमाणे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र अंधेरी या ठिकाणी आहे त्याच धर्तीवर पारनेर तालुक्याचे सांस्कृतिक केंद्र मुंबई,नवी मुंबई, अथवा पारनेर, तालुक्यात उभे राहावे असे प्रतिपादन दलित पॅंथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांनी आयोजित जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाला आपली उपस्थित दाखवून आपले विचार प्रगट केले
दरम्यान या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन पारनेर तालुका नवी मुंबईकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानव विकास संस्था नवी मुंबई या संस्थेचे अध्यक्ष शांताराम खुपटे, सिद्धार्थ साळवे ,अध्यक्ष कैलास गायकवाड, कार्यकारणी सदस्य रामचंद्र रोकडे, सुरेश रोकडे, साळवे हरीश पडवळ माधव गायकवाड,अंजनाताई पाडळे. इत्यादी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून कामगार नेत्या श्रुतीताई शाम म्हात्रे, राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव पोपटराव सोनवणे, उपस्थित होते पारनेर तालुक्याचे विधानसभेचे आमदार निलेश लंके या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यामुळे आयोजकांनी नाराजी व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत गायकवाड यांनी केले
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम