वाशी येथे राष्ट्रीय कार्य कर्तृत्व सन्मान महोत्सव सोहळा संपन्न !
- by Reporter
- May 29, 2023
- 353 views
नवी मुंबई- टी एम जी क्रियेशन्स आणि एम व्ही एस यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कार्य कर्तृत्व सन्मान महोत्सवात "सलाम इंडिया अभिमान पुरस्कार" सोहळा मोठ्या थाटामाटात उत्साहात नुकताच साहित्य मंदीर, वाशी येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी श्रीनिवास गडकरी, कवी विलास देवळेकर, गीत गायक आणि संगीतकार गिरीश पंचवाडकर, शाहीर दत्ताराम म्हात्रे, आणि कवी जनार्दन पाटील यांनी स्वरचित रचना सादर करण्यात आले.
राष्ट्रगीत व दीप प्रज्वलन करून, राष्ट्रीय कार्य कर्तृत्व सन्मान महोत्सव सोहळ्यास सुरूवात करण्यात आले. सोहळ्याचे प्रास्ताविक संस्थापक एन.डी.खान यांनी केले.
यावेळी उद्घाटक मान. महानिरिक्षक मनोज वसंत बाडकर (तटरक्षक पदक, कमांडर, तटरक्षक पश्चिम क्षेत्र - महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा व दीव दमण), आणि प्रमुख अतिथी मा. निलांबरी भोसले (कामगार उपायुक्त), मा. चिन्मयी सुमित (सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री), मा. डॉ सलीम शेख (अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन), मा. डॉ. रमा भोसले (शिक्षण तज्ञ तथा प्राचार्य, शासकीय अध्यापक महाविद्यालय, पनवेल), मा. विसूभाऊ बापट (कुटुंब रंगलय काव्यात- फेम), मा. नंदेश उमप (सुप्रसिद्ध गायक व शाहिर) सन्मा. अतिथी मा. सुरेश कोते (मा. सी.ई. ओ. लिज्जत पापड), मा. ॲड संगीता रोकडे (विधीतज्ञ तथा प्रख्यात समाजसेविका), मा. पल्लवी सोनेने (टी व्ही सिरियल अभिनेत्री), दिग्दर्शक व पत्रकार महेश्वर तेटांबे, सिने अभिनेत्री सिध्दी कामथ, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.संस्थापक एन.डी.खान यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सदरहू नयनरम्य सोहळ्याचे संयोजिका सौ.सलमा खान होत्या. पुरस्कार सोहळ्याचे उत्कृष्ट सुत्रसंचालन अभिनेत्री गौरी देशपांडे यांनी केले.
या शानदार सोहळ्यात, टी.एम.जी क्रीयेशन्स प्रस्तुत "सुरमयी लम्हे" गीत संगीताचा बहारदार कार्यक्रम "मराठी- हिंदी गीतांनी" विशेष बहार आणली आहे. जेष्ठ कवी विलास देवळेकर यांनी 'सलाम इंडिया अभिमान पुरस्कार वर' आधारित केलेली काव्यरचना सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. उपस्थितांपैकी अनेकांनी त्यांच्या काव्यरचनेच्या फ्लॅक्स सोबत फोटो काढलेत.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते, विविध क्षेत्रातील महाराष्ट्रातील उउल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवावृत्तींना "सलाम इंडिया अभिमान पुरस्कार प्रदान" शाल- स्मृतीचिन्ह- सन्मानपत्र आणि पदक बहाल" करण्यात आले आहे.
रिपोर्टर