महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वार्ता फलकाचे अनावरण
नवी मुंबई - महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या अ. उ. दा. सं व सु. विभाग, डोंबिवली शाखेच्या वार्ता-फलकाचे अनावरण संघटनेचे माजी केंद्रीय उपाध्यक्ष रमेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष संजय मोरे साहेब, उपसरचिटणीस अश्वजीत गायकवाड, संघटनेचे माजी उपसरचिटणीस दिनेशकुमार कांबळे, माजी केंद्रीय उपाध्यक्ष मान. मधुकर कांबळे व केंद्रीय उपाध्यक्ष जयंत कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.
फलकाच्या अनावरण प्रसंगी संघटनेच्या पनवेल मंडळ चे अध्यक्ष आशिष सोरटे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आलेल्या सभेत उपस्थित असलेल्या संघटनेच्या नवनिर्वाचित केंद्रीय पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास उपस्थित कर्मचाऱ्यांद्वारा मुख्य कार्यालयाच्या धर्तीवर राज्यातील इतर परिमंडळातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी, अवेळी होणाऱ्या बदल्यांमुळे पाल्यांच्या शालेय प्रवेशाच्या नुकसानीचा प्रश्न, मेडिक्लेम पॉलिसी बाबतचे सेटलमेंट चे प्रश्न, बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या अनियमित वेतनाचा मुद्दा इत्यादी धोरणात्मक प्रश्न उपस्थित केंद्रीय पदाधिकाऱ्यांपुढे चर्चेला घेण्यात आले.
मागासवर्गीय संघटन हे एक सामाजिक संघटन असून केवळ वैयक्तिक प्रश्नांपेक्षा सदस्यांनी मागास बहुजन समाजातील कर्मचाऱ्यांच्या हिताचे धोरणात्मक प्रश्नांवर आपण आग्रही राहिले पाहिजे व येत्या काळात संघटनेच्या वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केंद्रीय पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मान. पवार यांनी केले व डोंबिवली विभागाचे अध्यक्ष मान. चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी डोंबिवली विभाग शाखेचे विकास चव्हाण, राहुल वी वी वीबावनगडे, प्रसाद पाटील, अश्विनी करंजे, समीर बाबर, आर. आर. पवार, शाखेचे व बाह्यस्रोत कर्मचारी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम