सिडको कार्यालयासमोर झोपडी धारकांचे धरणे आंदोलन

नवी मुंबई- महाराष्ट्र सरकारने काढलेल्या जीआर व पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार सबका साथ सबका विकास या धोरणाला  केराची टोपली दाखवत सध्या नव्या मुंबईत झोपडपट्टी हटाव मोहीम निर्दय पणे राबवली जात आहे. सिडकोद्वारे रहिवाश्यांना नोटीस बजावण्यात आल्या असून काही दिवसांची मुदत देण्यात आली आहे याउलट मोकळ्या भूखंडावर भूमाफिया मोकटपणे प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून 

पाच सहा मजली इमारती बिनधास्त बांधत आहेत हा अन्याय सहन केला जाणार नाही, असा थेट आरोप  झोपडीधारकाकडून करण्यात येत आहे हे आंदोलन ग्राहक संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष हिरामण दादा पगार यांच्या नेतृत्वाखाली होत आहे या आंदोलनाला रिपब्लिक सेना यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे 

सिडकोच्या तोडक कारवाई विरोधात व मानवतेच्या दृष्टिकोनातून पावसाळा तोंडावर आल्याने गोरगरीब झोपडी धारकांना बेघर न करता कारवाई थांबविण्यात यावी अन्यथा सिडको भवन समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहील व येत्या काळात हे आंदोलन उग्र झाल्यास त्यास सिडको प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील असा गंभीर इशारा आंदोलन कर्त्याद्वारे देण्यात आला. 

यावेळी विनिता बाळेकुंद्री, सुधाकर जाधव, राजू वंजारे, सुनंदा बाविस्कर, कैलास सरकटे, दत्ता बनसोडे आदी विविध संघटना प्रतिनिधींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

संबंधित पोस्ट