राजपूत भामटा जातीतून भामटा शब्द हटवू नका! डॉक्टर अनिल साळुंखे यांनी केली मुख्यमंत्र्याकडे मागणी!.
नवी मुंबई ; रजपूत भामटा विमुक्त जाती प्रवर्गातील एक माजी गुन्हेगार जमात आहे. या जातीतून भामटा शब्द हटविण्याची मागणी राजपूत भामटा समाजाने कधीही केलेली नाही.ही मागणी करणारे राजपूत भामटा या जातीचे नाहीत.त्याची जात मीना आणि सवर्ण राजपूत आहे.राजपूत, राजपूत भामटा आणि मीना या 3 वेगवेगळ्या जाती आहेत.यांच्यात कोणतेही साम्य नाही संस्कृती,देवी देवता,रीती रिवाज,परंपरा, चालीरीती, बोलीभाषा,गुप्तभाषा अतिगुप्त भाषा,सांकेतिकभाषा, लग्नसंस्कार,जन्म संस्कार, मृत्यू संस्कार, विवाह विधी, रोटी व्यवहार, बेटी व्यवहार,आदी बाबतीत प्रचंड भिन्नता आहे.केवळ राजपूत भामटा च्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी यांनी भिन्न जातींच्या लोकांनी राजपूत भामटा समाजात घुसखोरी केली असल्याचा आरोप डॉक्टर साळुंखे यांनी केला आहे.
भामटा शब्द हटविण्या मुळे 14 विमुक्त जातींचे नुकसान होणार आहे. विमुक्त जातींमध्ये प्रामुख्याने बंजारा,वडार रामोशी कैकाडी, बेरड, बेस्तर,भामटा, कंजारभाट, टकारी, राजपूत भामटा, राज पारधी,पाल पारधी, वाघरी,छप्पर बंद,या जातींचा समावेश होतो.या माजी गुन्हेगार जाती असून,ब्रिटिश काळापासून नोटीफाईड जाती आहेत.1871 साली गुन्हेगार जमाती कायदा तयार करून यांना सेटलमेंट जेल मध्ये बंद करण्यात आले आहे.शतकानुशतके एकमेका पासून विभक्त वाटचाल करणाऱ्या जाती आज केवळ विमुक्त जाती च्या सवलतींवर डल्ला मारत घुसखोरी करत आहेत. महाराष्ट्र शासनाची दिशाभूल करून शासनाचे विविध लाभ पदरात पाडून घेत आहेत.यांचा शोध घेऊन यांच्यावर बनावट गिरीचे, अजामीन पात्र फौजदारी गुन्हे दाखल तात्काळ दाखल करावेत. अशी मागणी अखिल भारतीय राजपूत भामटा युवक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अनिल साळुंखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे ही मागणी मान्य न झाल्यास राजपूत भामटा समाज तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील डॉक्टर साळुंखे यांनी दिलेला आहे
दरम्यान अखिल भारतीय राजपूत भामटा संघटनेच्या वतीने डॉक्टर अनिल साळुंखे महाराष्ट्र शासनाचे मंत्री संजय राठोड आमदार राजेश राठोड आमदार इंद्रनील नाईक आमदार सुभाष राठोड माजी खासदार हरिभाऊ राठोड डॉक्टर राम चव्हाण राजपाल सिंग राठोड अभय चव्हाण विना साळुंखे समीक्षा गौड योगेश बागडे विनोद परमार सुधीर साळुंखे धीरज गौड नितीन बायस सुनील गौड कन्हैया भैसडे एडवोकेट विशाल पवार मनीषा पवार कैलास शेळके आदी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर केलेले आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम