गुटखा बंदीसाठी प्रहार जनशक्ती आक्रमक राज्यभर जनआंदोलनाचा इशारा!.
नवी मुंबई - आज एकट्या गुजरात राज्यातून महाराष्ट्रात अवैध्य रित्या गुटका आणला जात आहे. एकूण पन्नास टक्के तरुण वर्ग गुटख्याच्या आहारी जाऊन कॅन्सर सारख्या भयंकर आजाराला बळी पडत आहे. देशाचे भविष्य तर धोक्यात आहेच शिवाय पोलीस प्रशासन देखील जागे असून झोपल्याचे सोंग घेत आहे. यात वरपासून खालपर्यंतच्या लोकांचे हितसंबंध जोडले गेले आहेत.
गुटखा बंदी असताना देखील महाराष्ट्रात सर्रास गुटखा विकला जात आहे. तो महाराष्ट्रात येतोच कसा? असा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे. गुटखा विक्रीला तात्काळ बंद करण्यात यावे अन्यथा राज्यभर जनआंदोलन पुकारले जाईल. या आशयाचे पत्र नुकतेच शिळ डायघर पोलीस स्टेशन येथे राज्यमंत्री बच्चु कडू यांचे खंदे समर्थक कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष आदित्य चिकटे याच्या वतीने देण्यात आले. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम