आगरी समाजात हळदीच्या कार्यक्रमाला भारतीय संविधान पुस्तकीचे वाटप!

नवी मुंबई - ठाणे जिल्हयातील नारीवली येथील इंटरनॅशनल ह्युमन राइट्स कमिशनच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव अंजली हरिश्चंद्र भोईर या ओबीसी समाजातील  स्त्रीने आपल्या दोन्ही मुलांच्या लग्न सोहळ्यात हळदी दरम्यान आलेल्या पाहुण्यांना मानपान म्हणून साडी चोळी सारख्या पारंपारिक यांची देण्याऐवजी भारतीय संविधानाचे साध्या, सोप्या भाषेत विश्लेषण करणारे संविधान अभ्यासक नुरखॉं पठाण लिखित "आपले संविधान.." "राज्यपध्दती नव्हेतर जीवनपध्दती" हे प्रसिध्द पुस्तक देऊन आपल्या समाजात संविधानातील आदर्श मूल्यांची ओळख करून देण्यासाठी एक क्रांतीकारी पाऊल उचलले आहे.

 अशी अनोखी क्रांतीकारी सुरूवात केल्याबद्दल संपूर्ण परिसरातून अंजली भोईर यांचे विशेष कौतुक होत आहे.यासाठी सामाजिक कार्यकर्ते गोरख राजगुरू यांनी पुढाकार घेऊन सदर उपक्रम यशस्वी करण्यात मोलाची  दिली. त्यांच्या संपर्कातील विविध समाजातील अनेकांना अशा वेगवेगळ्या मंगलप्रसंगी संबंधित पुस्तके देण्यासाठी प्रवृत्त करणारे असल्याबाबत अंजली भोईर आणि गोरख राजगुरू यांनी याप्रसंगी  जाहीर केला. संविधान जनजागृतीसाठी उचलेले हे पाऊल नक्कीच समाजात संविधानिक आदर्श मूल्ये रूजवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल असा उपस्थित बांधवांनी व्यक्त केले आहे  केले.

 या पुस्तकाचे प्रकाशक विलास पवार, गोरख राजगुरू,सुमेध रोकडे, रमेश राऊत,निलेश शेलार,वंदना आर्केडे आणि अनिता राजगुरू आदी सर्व संविधानाचा प्रचार-प्रसार करणारी इंटरनॅशनल ह्युमन राइट्स कमिशनची सर्व सभासद उपस्थित होते.

संबंधित पोस्ट