समाजसेवक अशोक वाकळे यांचे निधन

नवी मुंबई - ठाणे कोर्ट नाका येथील अशोक टायपिंग सेंटरचे मालक व ज्येष्ठ समाजसेवक अशोक वाकळे यांचे नुकतेच नाहूर येथील राहत्या घरामध्ये वयाच्या ( ७१) व्या वर्षी निधन झाले गेल्या काही वर्षापासून अर्धांगवायू या आजाराने त्रस्त होते 

गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने त्यांच्या मित्र परिवारात  शोककळा पसरलेली आहे त्यांच्या पश्चात एक मुलगा चार मुली असे कुटुंब असून त्यांच्या जाण्याने समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे 

सांगली जिल्ह्यातील वाळवा  तालुक्यातील रेटरेहरणाक्ष या छोट्याशा गावातून त्याने आपली वाटचाल मुंबईच्या दिशेला येऊन उद्योग धंद्यामध्ये यशस्वीरित्या यश संपादन केले होते.

संबंधित पोस्ट