जनकल्याण सामाजिक संस्था तर्फे गरजू महिलांना साडी वाटप दिव्यांगांना मिठाईचे वाटप !

नवी मुंबई -  भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्य साधून जनकल्याण सामाजिक संस्था नवी मुंबई या संस्थेच्या माध्यमातून विभागातील गरजू विधवा महिलांना मोफत साड्या वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दिव्यांग नागरिकांना देखील यावेळी मिठाईचे वाटप  करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान दिव्यांग नागरिक व परिसरातील विधवा गरीब महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन जनकल्या सामाजिक संस्था नवी मुंबईचे संस्थापक अध्यक्ष राजेश जैस्वाल यांनी केले होते यावेळी महापे येथील  काँग्रेसचे माजी  नगरसेवक नामदेव डाऊरकर महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण वंचित बहुजन आघाडीचे गजानन जाधव उत्तमराव रोकडे बहुजन समाज पार्टी नवी मुंबई प्रभारी प्राध्यापक दत्ता हेगडे समाजसेविका शुभांगीताई गायकवाड, प्रशासकीय सचिव प्राध्यापक आराख सर प्रफुल हंबर्डे, रोशनीताई हंबर्डे प्रबुद्ध दिव्यांग फाउंडेशनच्या सुवर्ण गजभिये  दलित पॅंथर ठाणे जिल्हा अध्यक्ष सुनील गायकवाड एडवोकेट बालाजी वाघमारे उद्योजक संताला शर्मा गौतम तायडे बाबा लोहार बौद्ध समाज पार्टीचे नवी मुंबई अध्यक्ष प्रतिभाताई अंभोरे या आणि सुखी व्हा! कल्याण होईल!. या मंत्राचे अध्यात्मिक गुरु जयवंत भगवान बाबा गुरव इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित पोस्ट