नवी मुंबई घनसोलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची१३२ जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नवी मुंबई - घणसोली विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचे औचित्य साधून भव्य  दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक आणि शैक्षणिक संस्था, धम्मदूत सामाजिक संस्था, संबोधी सामाजिक संस्था, भारतीय बौद्ध महासभा आणि बुद्धिस्ट युथ ऑफ घनसोली सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिरवणुकीमध्ये हजारोच्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन कटारे यांच्या सह डी जे सूर्यवंशी, सतीश केदारे, महेंद्र साळवी, साहेबराव वाघमारे, उत्तम रोकडे, जयराम जाधव, राजेंद्र झेंडे, प्रभाकर ओव्हाळ, दिलीप व्हावळे, संजय कांबळे, आकाश मंडळे, चंद्रकांत वाघमारे आदी कार्यकर्त्यांनी मिरवणूक  यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट