रामदास आठवले यांच्या हस्ते नवी मुंबईत नवीन शेट्टी यांच्या रिपाई कार्यालयाचे उद्घाटन !

नवी मुंबई -  नवी मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केट परिसरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे तुर्भे वार्ड क्रमांक २२ चे अध्यक्ष नवीन शेट्टी यांच्या रिपाई पक्ष कार्यालयाचे भव्य उद्घाटन भारत सरकारचे केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले  यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सिद्राम ओव्हाळ रिपाई नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष महेश खरे, उपाध्यक्ष सुभाष भोळे,  सरचिटणीस एल आर गायकवाड, नवी मुंबई युवा अध्यक्ष विजय कांबळे,महाराष्ट्र प्रदेश मराठा आघाडीचे बाळासाहेब मिरजे, समाजसेवक सुरेश शेट्टी यांच्यासह रिपाईच्या अनेक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते۔

दरम्यान : नवी मुंबईमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले व नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे यांच्या नेतृत्वाखाली  मजबूत होत असून अनेक समाजाचे व इतरत्र पक्षाचे कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षामध्ये काम करण्यास इच्छुक असल्याची माहिती रिपाई पक्षाचे नवी मुंबई उपाध्यक्ष सुभाष भोळे यांनी दिली

संबंधित पोस्ट