घणसोली सेंट्रल पार्कमधील तरण तलाव कार्यान्वित करण्याचे आयुक्त राजेश नार्वेकर ह्यांचे निर्देश

नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेने घणसोली येथे निसर्गाच्या पंचतत्वांवर आधारित सेंट्रल पार्क विकसित केले असून या पार्कमध्ये नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधांची पाहणी करताना आयुक्तांनी येथील सुविधा सुस्थितीत रहाव्यात व नागरिकांना याचा पूर्ण उपयोग घेता यावा यादृष्टीने काही सुविधांमध्ये सुधारणा सुचविल्या. विशेषत्वाने येथील तरण तलाव कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने गतीमान कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. सेंट्रल पार्कच्या सभोवताली सकाळी व संध्याकाळी नागरिक मोठ्या प्रमाणावर जॉगींगसाठी येत असतात. तेथील जॉगींग ट्रॅकही सुव्यवस्थित राखण्याची काळजी घेण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या.

संबंधित पोस्ट