बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न सोडवण्याची गरज !रूपाली दोंदे यांनी व्यक्त केले मत

नवी मुंबई- देशातील वाढती बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न ही देशातील मुख्य समस्या असून या समस्यावर त्वरित तोडगा   काढून   वाढती   बेरोजगारी रोखण्यासाठी काय करता येईल व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न कशाप्रकारे सोडवता येईल अशा विविध मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय परिसंघ यांच्या वतीने आयोजित केलेल्या खुलेआम चर्चा वर बोलताना परिसंघाच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष रूपाली दोंदे यांनी संबंधित परिषदे दरम्यान बोलताना आपले मत व्यक्त केले

परिसंघा" ची महाराष्ट्र राज्यस्तरीय गोलमेज परिषद,त्रीरत्न विहार,शासकिय वसाहत बांद्रा(पुर्व),मुंबई येथे  आयोजित करण्यात आली होता.या परिषदेला प्रमुख वक्ते माजी न्यायमुर्ती थुल आणि .प्रा.राठोड उपस्थित राहुन परिषदेला मार्गदर्शन केले.

दरम्यान सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव दिनेश डिंगळे यांनी शासनाच्या सोई-सवलती बाबात सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले.उपस्थितांनी शिक्षण,रोजगार  यावरील समाजाच्या समस्या मांडल्या व त्या सोडवण्याची अपेक्षा व्यक्त केल्या,केंद्राने घेतलेले चुकींच्या धोरण व निर्णयावर जोरदार विरोध दर्शविण्यात येऊन निषेधाच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.या परिषदेची दखल समाजाने व सरकारने घेणे आवश्यक आहे यासाठी राज्य अध्यक्षांनी केंद्र व राज्य सरकार ना निवेदन स्वरुपात कळवावे आणि त्याची प्रत केंद्रीय अध्यक्षांना पाठवावी असे आवाहान रमेश धिवारे, यांनी केले आहे۔

संबंधित पोस्ट