काँग्रेस पक्षाच्या नवी मुंबई उपाध्यक्षपदी धोंडीराम पाटील यांची निवड !..

नवी मुंबई -  नवी मुंबई काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत तथा कोपरखैरणे तालुका अध्यक्ष धोंडीराम पाटील यांची नवी मुंबई काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष-पदी निवड करण्यात आलेली आहे 

धोंडीराम पाटील निष्ठावंत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असून यापूर्वी त्यांनी कोपरखैरणे विभागात काँग्रेस पक्ष वाढीसाठी अतोनात प्रयत्न केले आहेत त्यांच्या पुढाकाराने कोपरखैरणे भागात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत पक्ष वाढीसाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी असणाऱ्या कार्यकर्त्याची व त्याच्या कार्याची दखल घेऊन नवी मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एडवोकेट अनिल कौशिक यांनी धोंडीराम पाटील यांची नवी मुंबई काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी  नियुक्ती केली आहे.

दरम्यान: नवी मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एडवोकेट अनिल कौशिक यांनी माझ्या कामाची दखल घेऊन नवी मुंबई काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी  जबाबदारी सोपविली आहे ती जबाबदारी माझ्या परीने सुरळीत पार पाडून नवी मुंबई मध्ये पक्ष वाढीसाठी अतोनात प्रयत्न करणार असल्याचे या नियुक्ती दरम्यान धोंडीराम पाटील यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट