अनमोल व समाज उपयोगी समता संस्थेचे विविध उपक्रम...
नवी मुंबई : समता सहकार्य सामाजिक संस्थेमार्फत शनिवारी संस्थेच्या नवीन वास्तूचे पूजन व समाजपयोगी नाविन्यपूर्ण खालील उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमासाठी सी. ए. नारायण भार्गव यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रजोलन करून विविध कार्यक्रमाची सुरुवात अनेक उच्च न्यायालयाचे वकील, सहकारी संस्थेचे पदाधिकारी, समाजसेवक, महिला, अपंग व्यक्ती व मुले यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
नवी मुंबईतील लहान मुली व महिला वरील अत्याचार रोखणे व त्याबाबतची कायद्यातील तरतुदी, सेल्फ डिफेन्स, स्त्रीभून हत्या व महिला सशक्तीकरण याबाबत कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून मिसेस महाराष्ट्र -२०२१ याशिका ढोले, डॉ. रंजना खोचरे, प्रोफेसर पिनल ताजणे, डॉ. आरती धुमाळ, सौ. शीतल निकम यांनी महिला सशक्तीकरण यावर योग्य मार्गदर्शन केले व त्यांच्याच हस्ते इतर महिलांना हळदी कुंकूवाचे वान म्हणून विविध औषधी वनस्पती तसेच अनेक प्रकारचे औषधी तुळशीचे रोप देण्यात आले.
नागरिकांना रक्ताचा तुटवडा भासत असून मानवतेच्या दृष्टीकोनातून रक्तदान व मरणोत्तर अवयव दान जनजागृती व कायदेशीर माहितीचे प्रमुख मार्गदर्शन म्हणून या कार्यक्रमासाठी डॉ. कैलास जवादे, डॉ. गोविंद जवादे, मिसेस मीरा सुरेश, मिसेस स्नेहल हंडे त्याचसोबत त्यांचे काही विद्यार्थी शुभांगी तायडे, प्रितेश गावंडे, यश सिंघ, यशवंत ठाकूर, कुणाल सत्रे, आयुष बिर्जी, वर्धा भागवत यासारखे अनेक मान्यवर उपस्थित राहून अवयवदानाबद्दल माहिती देऊन मोफत कार्ड वाटप केले.
भारतात ऋषीमुनीच्या कालखंडापासून लाखो औषधी वनस्पतींचा खजिना उपलब्ध असताना देखील आधुनिकीकरणाच्या नावाखाली परकीय औषधी कंपनी यांनी करोडो खर्च केले जातात पण, भारतीय औषधी वनस्पतीची जनजागृती नसल्यामुळे व ते आजूबाजूला सहज उपलब्ध असताना देखील आयुर्वेदिक औषधी वनस्पती यांचा उपयोग कसा करावा याबाबतची मोफत माहिती व मार्गदर्शन श्री. आबा रणवरे यांनी दिले व उपस्थितांना मोफत औषधी रोप वाटप करण्यात आले.
MCS Act मधील कलम १५४ बी व Bye-laws नुसार सहकारी कायद्यातील झालेले नवीन बदल, याबाबत नागरिकांना सहकारातील कायदेतज्ञ ऍड. राहुल पाटील, श्री. उदय तांदळे, ऍड. श्रीकांत चव्हाण यांनी उपस्थितांना मोफत मार्गदर्शन केले.
नवी मुंबई पोलिस विझीलंटचे प्रमुख एफ. आर. ओ. डॉ. विशाल आनंदराव माने व त्यांचे सहकारी यांनी उपस्थित सर्व नागरिकांना सायबर क्राईम गुन्हेगारी याबाबत तपशीलवार माहिती देऊन होणारे विविध गुन्हेगार लोकांच्यापासून कोणती दक्षता घेण्यात यावी याबाबतचे अनेक उदारणासह माहिती देण्यात आली
समता ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. चंद्रकांत निकम व संस्थेचे इतर पदाधिकारी यांनी “समता स्मरणिका”चे प्रकाशन अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. समता ट्रस्टने आज पर्यंत केलेल्या १०० पेक्षा अधिक समाजपयोगी कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली व त्यांच्या या कार्याची दखल शासकीय विभागात घेतली जाते याबद्दल उपस्थित नागरिकाने टाळ्या वाजवून संस्थेचे अध्यक्ष ऍड. चंद्रकांत निकम यांचा सत्कार करण्यात आला व ग्रामीण व गरीब परिस्थितीची जाणीव असताना देखील दिवसरात्र काम करून तसेच सामाजिक व स्वताचे व्यवसाय सांभाळून त्याचसोबत अनेक संस्थेला मोफत मार्गदर्शन करत मुंबई विद्यापीठातून अनेक पदवीत्तर डिग्री घेण्याचे महान कार्य केल्याबद्दल उपस्थितांनी त्यांच्या पुढील प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करून प्लास्टिक मुक्तता साठी ५०० पेक्षा अधिक लोकांना उच्च प्रतीचे दैनंदिन उपयोगात येणारे टिकाऊ मोफत बॅग वाटप करण्यात आले.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम