एपीएमसी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी तन्वीर शेख यांनी स्वीकारला कार्यभार !
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त पदी मिलिंद भारंबे यांनी कार्यभार स्वीकारल्या पासून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदली करून आयुक्त हद्दीतील पोलीस अधिकाऱ्यांचे खांदेपलट करण्यात आले आहेत.
एन आर आय पोलीस स्टेशनचे तात्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख नवी मुंबई येथील एपीएमसी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरक्षक पदाचा कार्यभार त्यांच्यावर सोपविण्यात आलेला आहे
तन्वीर शेख हे 1993 पासून पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत, पोलीस खात्यामध्ये शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी इतरत्र पोलीस स्टेशन मध्ये उल्लेखनीय असे काम केलेले आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे एपीएमसी पोलीस स्टेशन अंतर्गत अवैद्य धंद्यांना आळा बसणार असून अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान : एपीएमसी पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांची ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण,संघटनेचे खजिनदार राजू मीर, पत्रकार सुनील गायकवाड यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम