मलंग गडावर ४० फूट उंच भगव्या ध्वजाची स्थापना!सह्याद्री प्रतिष्ठान दुर्गा संस्थेचा अभिनव उपक्रम

नवी मुंबई : कल्याण, अंबरनाथ येथील मलंग गडावर रविवार दिनांक १२  मार्च २०२३  रोजी गडाच्या बालेकिल्ल्यावर जीर्ण झालेला भगवा बदलून त्या ठिकाणी कायम स्वरूपी ४० फूटी  भगवाध्वज, स्तंभ लावण्याची मोहीम ,सह्याद्री प्रतिष्ठान व दुर्गा संस्थेमार्फत आयोजित केली होती.

या मोहिमेत एकूण ३५ दुर्गसेवक आणि ६९ संस्थानी  मिळून ४८ तास देऊन मलंग गड, बजरंग दल, पनवेल विभाग, श्रीवर्धन विभाग, कल्याण विभाग, उल्हासनगर विभाग ,इत्यादी परिसरातील गावकऱ्यांनी भाग घेऊन ,सदरची मोहीम यशस्वी केली.

 दरम्यान: हे उत्कृष्ट कार्य करण्यासाठी ज्या ज्या परवानग्या ,आवश्यक असतात ,त्या परवानगी रीतसर मिळून देण्यासाठी   कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि महेश पाटील ,यांनी मेहनत घेऊन ही मोहीम देखील ,त्यांच्या नेतृत्वाखाली  पार पाडण्यात आली.

कित्येक वर्ष अपुऱ्या राहिलेल्या  इच्छा  प्रत्येक्षात सह्याद्री प्रतिष्ठानच्या साहाय्याने पूर्ण करुन मलंग गडावरील भगव्याचा स्वप्न अंबरनाथ  तालुका विभागा मार्फत पूर्ण करण्यात आले.

महाराष्ट्रात किती तरी असे गिरी दुर्ग, भुईकोट किल्ले, डोंगरी किल्ले, सागरी किल्ले आहेत, की ते आता शेवटची घटका मोजताना दिसतात, त्यांचे संवर्धन होत नाही की त्यांच्याकडे कोणी वळून सुद्धा पाहत नाहीत.  ह्या अशा जीर्ण झालेल्या, पडत आलेल्या वास्तूकडे लक्ष, संवर्धन करण्याचं काम महाराष्ट्रातील दुर्ग संस्था मोठ्या जिद्दीने करताना दिसतात. 

ते संवर्धनच्या दुष्टीने हरवलेल्या स्मृतीना ऊर्जा देऊन गडकोट संवर्धन करण्याचं व ते लुप्त झालेल्या इतिहासाच्या पाऊल खुणा जपण्याचं कार्य मोठया उत्सुखतेने करताना दिसतात. 

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान व  सह्याद्री प्रतिष्ठान अंबरनाथ  ह्यांच्या मतानुसार दुर्गसंवर्धन करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील प्रत्येक ,व्यक्तीची आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने गड टिकून राहावेत यासाठी  संवर्धन कार्यात सहभागी होऊन इतिहास जपण्याचे कार्य करावे असे , आव्हानेत सहभागी झालेल्या, शिवप्रेमी व्यक्तीने केले

संबंधित पोस्ट