पद्मश्री नामदेव दादा ढसाळ यांच्या जयंती म्हसवड येथे मोठ्या उत्साहात साजरी
नवी मुंबई - दलित पॅंथरचे संस्थापक व विद्रोही कवी पद्मश्री नामदेव दादा ढसाळ यांची जयंती सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
या जयंती मध्ये पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी पॅंथरच्या काळात अनन्याय अत्याचारा विरोधात टक्कर देऊन प्रस्थापित जातीवादी व्यवस्थेची दाना दान उडवून जातीयतेला सळो की पळो करून सोडले होते दलित पॅंथरचाा दबदबा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये दलित पॅंथरचे नाव आणि निशाण होते हेच नाव आणि निशाण पुन्हा उभ राहण्यासाठी दलित पॅंथर चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ हे राज्यभर दौरे करीत असून ठिकठिकाणी संघटनेचे अस्तित्व निर्माण करण्या साठी झटत आहेत पद्मश्री नामदेव दादा ढसाळ यांच्या जयंतीच्या औचित्य साधून माण तालुक्याच्या अतिशय दुर्गम आणि खेडेगावात वाकी
वरकुटे या मातंग समाजाच्या वस्तीमध्ये दलित पॅंथरच्या छावणीच्या शाखेचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान: माण तालुक्यातील म्हसवड या गावी , झालेल्या सभेत, १९७२ मध्ये , दलित पॅंथर च्या स्थापनेनंतर झालेल्या अनेक सभांची आठवण, देणारी झंजावत करणारी ऐतिहासिक सभा मातंग समाजाच्या वतीने म्हसवड मध्ये पार पडली या सभेमध्ये अनेक वक्त्यांनी आक्रमक घोषणाबाजी देत भाषणे केली.
या सभेचे आयोजन पश्चिम महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद नंदकुमार लोखंडे किरण बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले
या कार्यक्रमाला मुंबई प्रदेशाध्यक्ष रोहित भंडारे रायगड जिल्हा अध्यक्ष मनोज गायकवाड, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, पुणे जिल्हा अध्यक्ष अंकुश आवाडे, पत्रकार सुनील गायकवाड,, पनवेल तालुका अध्यक्ष रिकी पवार, चिटणीस श्रावण महाडिक, महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे महेंद्र वाघमारे पिंपरी चिंचवड अध्यक्ष अर्जुन शिंगे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष आकाश दबकरे रेखाताई सूर्यवंशी राजेंद्र माने सर संपर्कप्रमुख नवनाथ लोखंडे धर्मराज लोखंडे शहर कार्याध्यक्ष विक्रम लोखंडे इत्यादी पॅंथर कार्यकर्ते उपस्थित होते
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम